जळगावचे ग्रामदैवत श्रीराम मंदिरात महायुतीच्या लोकसभा उमेदवार स्मिता वाघ यांनी फोडला प्रचाराचा नारळ*
शहरात ठिकठिकाणी जल्लोषात झाले स्वागत
जळगाव दि.२६ : महायुतीच्या जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचाराचे नारळ जळगाव नगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीराम मंदिरात दि.२६ शुक्रवारी फोडण्यात आले. श्रीराम मंदिरापासून सुरू झालेला त्यांचा प्रचार दौरा बळीराम पेठेतील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाजवळ संपन्न झाला. दरम्यान, शहरात ठिकठिकाणी त्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत झाले. जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कमळ फुलविण्याचा निर्धार यावेळी उपस्थित सर्वांनी केला.
स्मिताताई वाघ यांच्या जुन्या जळगावमधील प्रचार दौऱ्यावेळी आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे, भाजपच्या महानगर जिल्हाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, महानगर उपाध्यक्ष तथा माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, माजी महापौर सीमा ताई व भारती सोनवणे, लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ.राधेशाम चौधरी, विधानसभा निवडणूक प्रमुख विशाल त्रिपाठी तसेच दीपक सूर्यवंशी, सुनील शेळके, कैलास सोनवणे, अरविंद देशमुख, अमित कोल्हे, सरिता माळी-कोल्हे, आशुतोष पाटील, मुकुंद मेटकर, आरपीआय महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, अमित भाटिया, किशोर चौधरी, सरोज पाठक, चंदन महाजन, डॉ. विरन खडके, अमित काळे, सुचिता हाडा, दिपमाला काळे, प्रकाश बालाणी, रेखा कुलकर्णी, रेखा वर्मा, गायत्री राणे, सुरेखा तायडे, दीप्ती चिरमाडे, भाग्यश्री चौधरी, रंजना वानखेडे, लीला चौधरी, मुकुंदा सोनवने, ललित बडगुजर, चेतन सनकत, जितेंद्र मराठे, मयूर कापसे, प्रवीण कोल्हे, महेश पाटील, आनंद सपकाळे, नितीन इंगळे, महेश जोशी, अजित राणे, राहुल घोरपडे, जयेश ठाकूर, पियुष कोल्हे, शक्ती महाजन, विकी सोनार, रियाझ शेख, मयूर शिंपी, मिलिंद चौधरी, धनंजय चौधरी आदींसह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.