उत्साहाच्या वातावरणात स्मिता ताईंच्या प्रचार रॅलीस प्रतिसाद
ग्राम दैवत प्रभु श्रीराम चे दर्शन घेऊन केला जळगाव शहरात प्रचाराला सूरवात
जळगाव दि.२७ : जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार स्मिताताई वाघ यांनी प्रचारार्थ काल दिनांक २६ एप्रिल पासून जळगाव शहरात प्रचाराची सुरुवात केली. सर्व प्रथम जळगावा चे ग्राम दैवत प्रभु श्रीराम मंदिर येथून सकाळी ९ वाजता श्रीराम मंदिराचे ह .भ.प.मंगेश महाराज यांचे आशीर्वाद घेऊन प्रचार रॅलीला सुरुवात केली.
सायंकाळी ५ वाजता रिंग रोड येथील श्री हनुमान मंदिर येथून मारुतीरायाचे दर्शन व आशीर्वाद घेऊन प्रचार रॅलीला सुरुवात झाली. रॅली हि जेडीसीसी कॉलनी,रिंग रोड,यशवंत कॉलनी,गणेश कॉलनी,नंदनवन कॉलनी व इतर भागांचा देखील समावेश होता. यादरम्यान शहराचे आ. सुरेश भोळे राजुमामा यांच्या “चंद्रमौळी” या निवासस्थानी स्मिताताई चे भव्य स्वागत करण्यात आले मा. महापौर सीमाताई भोळे यांनी ताई चे औक्षण केले. उपस्थित महिला नागरिक व जेष्ठाचे आशीर्वाद घेतले. रॅलीला उत्साहाच्या वातावरणात या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. पंतप्रधान नरेंद्र मोदीजीं विकासाच्या संकल्पनेसोबतच उभे आहोत असा विश्वास नागरिकांनी दर्शवला.
यावेळेस आ राजुमामा भोळे,महानगर अध्यक्ष उज्वला ताई बेंडाळे, मा उपमहापौर अश्विन भाऊ सोनवणे प्रदेश महिला सचिव रेखाताई वर्मा माजी नगरसेविका ॲड. सुचीताताई हाडा, दिपमाला काळे, आरपीआय ए चे अनिल अडकमोल, शिवसेनेच्याअध्यक्ष, सरिता ताई कोल्हे माळी, मंडल अध्यक्ष मनोज काळे, केदार देशपांडे अरविंद देशमुख, दिलीप पोकळे विशाल त्रिपाठी गायत्री राणे, सरोजताई पाठक आशिष सपकाळे यासह महायुतीचे पदाधिकारी व कायकर्ते मोठ्या संख्येसह उपस्थित होते.