जळगांव दि.८ मे २०२३ : येत्या शुक्रवार दिनांक १० रोजी अक्षय तृतीया निमित्ताने विशेष
(द्वारकाधीश दिगंबर जोशी)
भारतीय संस्कृतीचा प्रारंभ, कृतयुगाचा प्रारंभ व कृषी पूजेचे प्रतीक म्हणजेअक्षय तृतीया होय. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त हे अक्षयतृतीयेच्या दिवशी असते. ‘वैशाख शुध्द तृतीयेला’ अक्षयतृतीया असे नाव आहे. हा सनातन धर्मियांचा प्रमुख सण आहे.
या तिथीला अक्षयतृतीया असे का म्हणतात, त्याचे कारण मदनरत्न ग्रंथात पुढीलप्रमाणे दिले आहे. श्रीकृष्ण युधिष्ठिराला सांगतात, हे युधिष्ठिरा या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात व नाही. म्हणून हिला मुनींनी अक्षयतृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस, जे कर्म केले जाते, ते. सर्व अक्षय व अविनाशी होते.
या तिथीस महत्त्व येण्याचे कारण
म्हणजे हा कृतयुगाचा (काहींच्या मते) त्रेतायुगाचा प्रारंभ दिन म्हणजे अक्षय तृतीय हा आहे व तो भारतीयांना’ नेहमीच पवित्र वाटतो. कारण या तिथीस स्नान, दानादि धर्मकृत्ये सांगितली गेलेली आहे. या व्रताचा विधी पुढीलप्रमाणे आहे. पवित्र जलात स्नान करून विष्णूची पूजा, जपहोम, दान, पितृतर्पण या दिवशी अपिंडकं श्राध्द करावे व ते जमत नसेल तर निदान तिलार्पण तरी करावे, असे सांगितले आहे. या दिवशी सिध्यासह उदकुंभही द्यावयाचा असतो. ‘याशिवाय उन्हापासून संरक्षण करण्याच्या छत्री, जोडा, वस्तुही दान द्यायच्याअसतात
या व्रताची कथा
अशी एक व्यापारी होता. तो नित्य दानधर्म करी व संत – महात्म्यांच्या कथा आवडीने ऐकी. – कालांतराने त्याला दारिद्रय आले. पुढे एकदा त्याने असे ऐकले की, बुधवारी
रोहिणीयुक्त तृतीया आल्यास त्या दिवशी केलेले पुण्य व दान अक्षय होते. त्याचा क्षय होत नाही. मग तसा दिवस येताच त्याने ते सगळे केले. मग पुढच्या जन्मी झाल तो कुशावती नगरीचा राजा झाला व त्याने अनेक मोठ-मोठे यज्ञ केले व अनेक प्रकारचे वैभवही भोगले. तरीही त्याच्या पुण्याचा क्षय झाला नाही (भविष्योत्तर पुराण). याच दिवशी परशुरामाचा जन्म झाला म्हणून या तिथीस परशुरामाची पूजा करून त्याला संत अर्घ्य देतात.
स्त्रियांना हा दिवस महत्त्वाचा असतो. त्यांना चैत्रात बसविलेल्या चैत्र गौरीचे विसर्जन करावयाचे असते. त्यानिमित्त त्या हळदीकुंकूही करतात.
ऋषभदेव यांनी एकवर्ष आणि काही – दिवस एवढ्या कालावधीनंतर हस्तिनापुराचा राजा श्रेयास याच्या घरी या तिथीस उसाच्या रसाचे प्राशन केले होते. त्यामुळे त्या राजाची भोजनशाला अक्षय झाली म्हणूनही या तिथीस अक्षयतृतीया हे नाव पडले आहे.
या दिवशी आदिनाथ व ऋषभदेव यांची पूजा करतात व त्यांना उसाच्या रसाचे स्नान घालतात. अक्षयतृतीयेच्या सणाला कृतयुगाचा प्रारंभ समजून आपण त्या दिवशीं कृषि (सेमी) व पशुसंवर्धन यांचे इं महत्त्व वाढविले पाहिजे. म्हणूनच म्हटले जाते की, कृषि हाच संस्कृतीचा प्रारंभ आणि तिचा मुख्य आधार होय.
द्वारकाधीश दिगंबर जोशी
पारंगत(संस्कृत)
पारंगत(मराठी)
पारंगत(तत्वज्ञान),
जळगाव