जळगाव दि.१५ जुन २०२४ : विद्यार्थ्यांमध्ये वृक्षारोपण, त्या रोपांचे संवर्धनाची जाणीव जागृती व्हावी. वाढत्या तापमानाला हातभार आणि पर्यावरण जोपासण्याच्या कार्यात हातभार लागावा, यासाठी शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक माध्यमिक विद्यालय येथे विविध झाडांच्या बिया वाटप कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना झाडांच्या बिया मध्ये विविध वृक्षांचे बीज वाटप करण्यात आले. यामध्ये त्यांनी गोळा केलेल्या चिंच, जांभूळ इत्यादी झाडांच्या जवळपास २००० बियांचे वाटप केले. यावेळी शाळेतील शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होत. सुट्टीमध्ये शाळेत विद्यार्थ्यां मार्फत बिया गोळा केल्या . शैक्षणिक संस्थाना वेगवेगळ्या झाडांचे बीज उपलब्ध होऊ शकते व येत्या पावसाळ्यात घरच्या घरी रोपे तयार करून त्याचे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लागेल असे मत मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी व्यक्त केले.