जळगाव दि.१६ जुन २०२४ : महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळ व अमरावती जिल्हा आट्यापाट्या संघटनेच्या वतीने भुगाव (परतवाडा) येथे घेण्यात आलेल्या ३१वी मुले व २४वी मुली राज्य अजिंक्यपद आट्यापाट्या क्रीडा स्पर्धेत जळगाव जिल्हा मुले व मुलींच्या संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत तृतीय स्थान प्राप्त केले आहे. जळगाव जिल्हा संघातील अनमोल तेलंग या खेळाडूला स्पर्धेतील उत्कृष्ट आक्रमक खेळाडू या पुरस्काराने आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. विजयी संघातील खेळाडूंचा सत्कार सिद्धिविनायक फाउंडेशनच्या संचालिका डॉक्टर अमृता सोनवणे यांच्या हस्ते सिद्धिविनायक विद्यालयात करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक आर. पी. खोडपे, गुलाबराव पाटील, जोत्सना श्रीनाथ ,अनिल माकडे हे उपस्थित होते.
जळगाव जिल्हा आट्यापाट्या संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार अण्णासो प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे, सचिव डॉ प्रदीप तळवेलकर, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू विशाल फिरके, विजय न्हावी, यांनी विजयी खेळाडूंचे कौतुक केले आहे. विजयी संघातील खेळाडूंना सिद्धिविनायक विद्यालयाते क्रीडा शिक्षक अनिल माकडे अँड.अक्षय टेमकर, स्वप्निल महाजन, देवेश पाटील, रोहित नवले यांचे मार्गदर्शन लाभले.
विजयी संघातील खेळाडूंची नावे खालील प्रमाणे
मुले संघ १) प्रणय राठोड (कर्णधार )२)अनमोल तेलंग ३)ओम गायकवाड ४) भावेश पाटील ५) वैभव गव्हाणे ६)तन्मय डोळे ७)राहुल पाटील ८)केतन काथार ९)निखिल पाटील १०)आयुष हैरोळे ११)तेजस पाटील १२)ऋतुराज चव्हाण.
मुली संघ
१)रोहिणी धांडे (कर्णधार)२) निशा गायकवाड ३)निशा लाहुडकर ४)गुणवंती पाटील ५)कल्याणी बोरसे ६)हेमांगी झुरकाळे ७)वैष्णवी अहिराणे ८)जया वानखेडे ९)कुनाली सबके१०) चारवी पाटील ११)जान्हवी माळी १२)आरती शिंदे.