जळगाव शहरातील रस्ते व गटारीं करीता डॉ.अश्विन सोनवणे यांनी मागितला भरघोस निधी
ना.गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
जळगाव दि.१७ जुन २०२४ :जळगाव शहराचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी आज महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश भाऊ महाजन यांच्याकडे जळगाव शहरासाठी अजून दोनशे ते तीनशे कोटी मिळणे बाबत व गटारांसाठी शंभर कोटी मिळणे बाबत निधीची मागणी केली, अशा विषयाचे निवेदन डॉ.सोनवणे यांनी ना.महाजन यांना दिले.
विषय :- जळगांव शहरासाठी अजुन २०० ते ३०० कोटी मिळणेबाबत व गटारांसाठी १०० कोटी मिळणेबाबत…
आदरणीय भाऊ आपणास विनंती की, यापुर्वी आपण जळगांव शहरासाठी भरघोस निधी मिळवून दिला. सर्वप्रथम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडून २५ कोटींचा निधी मिळवून दिला. त्यानंतर शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी मिळवून दिला. त्यातुन ४२ कोटींचे काम चालु आहे. त्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आपल्या माध्यमातुन काँक्रीट रस्त्यांसाठी १०० कोटी प्राप्त झाले व त्यातुन रस्त्यांची कामे चालु आहेत. परंतु शहरातील भरपुर कॉलनी परिसरातील रस्त्यांची कामे अजुनही बाकी आहेत व काही परिसरांमध्ये रस्ते सुध्दा झालेले नाहीत. म्हणून आपणास विनंती की, शहरातील रस्त्यांसाठी अजुन २०० ते ३०० कोटीचा निधी मंजुर करुन द्यावा व गटारींची स्थिती खराब असल्याने गटारींसाठी सुध्दा १०० कोटींचा निधी मंजुर करुन द्यावी ही नम्र विनंती.
निवेदन देते वेळी भाजपा महानगर अध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, लोकसभा प्रमुख राधेश्याम चौधरी, माजी उपमहापौर सुनील खडके,भाजपा सरचिटणीस अमित भाटिया,सौरभ लुंकड,डॉ.क्षितिज भालेराव उपस्थित होते.