अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघ जळगाव आणि जिल्हा शिंपी समाजा तर्फे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री ना.रक्षा खडसे यांचा भव्य सत्कार
माझ्या निवडी मागे शिंपी समाजाचा खारीचा वाटा : ना.रक्षा खडसे
जळगाव दि .१७ जुन २०२४ : नुकत्याच लोकसभा निवडणुकी संपन्न झाल्या या लोकसभा निवडणुकीमध्ये रावेर लोकसभा मतदारसंघातून ना.रक्षा खडसे तिसऱ्यांदा खासदार पदि प्रचंड मताधिक्याने निवडून आल्या व केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपद मिळाल्याबद्दल शिंपी समाजाच्या वतीने ना. रक्षाताई खडसे यांचा सत्कार दिनांक १६ जून रविवार रोजी भालोद ता. यावल येथे रावेर जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी ना रक्षाताई यांना संत नामदेव महाराज यांची मूर्ती, शाल, श्रीफळ ,व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार राष्ट्रीय महिला अध्यक्ष सुषमाताई सावळे, जिल्हाध्यक्ष बंडू नाना शिंपी, राज्य संघटक मनोज भांडारकर, विवेक जगताप, कुसुम बिरारी, प्रमोद शिंपी, यांनी केला.
कार्यक्रमा प्रसंगी मनोज भांडारकर यांनी सांगितले की नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा २०२४ निवडणुकीत रावेर लोकसभा मतदार संघात ग्रामीण व शहरी भागामध्ये शिंपी समाजाचे कार्यकर्ते व पक्षाचे पदाधिकारी यांनी गावोगावी जाऊन रक्षाताईंचा प्रचार केला होता. तसेज जळगाव येथे शिंपी समाजाचा भव्य मेळावा घेऊन खा रक्षाताईना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प केला होता. तो पूर्ण झाला .आणि त्याच माध्यमातून हा सत्कार समारंभ आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.
.
या प्रसंगी नामदार रक्षाताई यांनी सांगितले की शिंपी समाजाच्या व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला निवडून आणण्यासाठी जे अथक परिश्रम घेतले असून त्यासाठी मी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करते व समाजाच्या प्रत्येक कामासाठी मी सदैव तत्पर राहून काम करेल कारण मला निवडून आणण्यासाठी शिंपी समाजाचाही खारीचा वाटा असल्याचे असे त्यांनी या प्रसंगी सांगितले. या सत्कार सोहळ्याप्रसंगी जिल्हा सचिव प्रदीप शिंपी, अनिल खैरनार, शरदराव बिरारी, प्रमोद शिंपी, युवक अध्यक्ष जितेंद्र शिंपी, चोपडा समाजाध्यक्ष अध्यक्ष संजय जगताप, नितीन बिरारी, आकाश बाविस्कर सदस्य किरण सोनवणे, दिलीप सोनवणे, शरदराव सोनवणे, योगेश खैरनार, शरद कापुरे, हेमंत शिंपी, निलेश चव्हाण, संतोष चव्हाण, अशोक सोनवणे, सुमित अहिराव, गिरीश देवरे, धर्मेंद्र जगताप, नागेश सावळे, इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.