जळगांव जिल्हाआरोग्य
आमदार राजु मामा भोळे यांचे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विविध मागण्यांसाठी आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन
मागण्या पूर्ण करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे आश्वासन
जळगाव, दिनांक १९ जुन २०२४ : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विविध मागण्यांसाठी शहराचे आमदार राजु मामा भोळे यांनीआरोग्यमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन दिले आहे.
जळगाव शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे एम.आर.आय.मशीन उपलब्ध करून देण्याबाबत व जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टर, नर्सेस, वार्ड बॉय यांची रिक्त पदे भरण्याबाबत शहराचे आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांनी आरोग्यमंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी केली असून याप्रसंगी जिल्हा रुग्णालयातील विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली व यावर ना. मुश्रीफ यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन या प्रसंगी आमदार राजु मामा भोळे यांना दिले आहे.