जळगाव दि.२० जुन २०२४ : युनिव्हर्सल मेंटर्स असोसिएशन (मुंबई) यांच्या वतीने नुकतेच मुंबईत एका शैक्षणिक कार्यक्रमात महाराष्ट्रातील सीबीएसई स्कूलच्या काही निवडक प्राचार्यांना ‘प्रिन्सिपल ऑफ द इअर ‘ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याच कार्यक्रमामध्ये खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची यांना देखील युनिव्हर्सल मेंटर्स असोसिएशनचे सीईओ संदीप गुलाटी यांच्या हस्ते ” प्रिन्सिपल ऑफ द इयर ” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कारासाठी निवड करताना सुषमा कंची यांनी आजपर्यंत प्राचार्य पदाच्या कारकिर्दीत सीबीएसईतर्फे नेमून दिलेल्या सर्व कामकाजाचा आढावा सीबीएसई पोर्टलवर जो अपडेट होतो, तो विचाराधीन घेतला गेला. या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील काही निवडक शाळेच्या प्राचार्यांचा समावेश होता. या पुरस्काराबद्दल खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, सचिव अँड. प्रमोद पाटील, कोषाध्यक्ष डी .टी. पाटील आणि प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर आदींनी कंची यांचे कौतुक केले आहे.