जळगाव दि.२३ जुन २०२४ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल २२ जुन रोजी जळगाव येथे आले असता समस्त वंजारी समाज सेवा संस्था, मेहरूण, संचालित जळगांव जिल्हा वंजारी युवा संघटना यांच्या वतीने माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
वंजारी जात भटक्या जमाती ‘ड’ मध्ये समाविष्ट असून या प्रवर्गास २.५ टक्के आरक्षण आहे. वंजारीच्या वंजार आणि वंजारा अशा दोन तत्सम जाती होत्या. त्यात आता ‘लाड वंजारी’ या जातीचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.
उपरोक्त विषयान्वये आपणांस विनंती करण्यात येते की, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पुणे यांनी वंजार आणि वंजारा अशा तत्सम जाती होत्या, त्यात आता लाडवंजारी या जातीचा नव्याने समावेश केल्याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर केलेला असुन शासनाने तो स्विकारला आहे.
सदर अहवालानुसार आपणांकडून लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अधिसुचना प्रलंबित होती. आता कृपया तशी अधिसुचना काढून लाडवंजारी समाजास सहकार्य करावे, ही अर्जपुर्वक विनंती.अशी मागणी करण्यात आली आहे.सध्या शाळा, कॉलेज मध्ये प्रवेशप्रक्रिया सुरू असल्याने पडताळणी दाखले मिळणे सोयीचे होईल.असेही निवेदनात म्हटले आहे.