जळगांव दि. २३ जुन २०२४ : रुख्मिणी फांउडेशन मिडटाऊन संस्थेकडुन जळगांव येथील बाल सुधार गृहातील.( रिमांड होम) मुला व मुलींना लागणारे अत्यावश्यक नवीन कपडे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी अँड.जि एम पाटील, व उदयोजक आशुतोष सेठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या प्रसंगी अँड जि एम पाटील यांनी मुला मुलींना भविष्यात चांगले शिकुन मोठे व्हावे चांगली व्यत्ति व्हावे असे सांगीतले व उत्कृष्ठ कार्यक्रम आयोजीत केल्या बद्दल संस्थेचे कौतुक केले.
उद्योजक आशुतोष सेठी यांनी सर्वोपरी सहकार्य करण्याचे व
अजुन काहीही मदत लागल्यास देण्याची तयारी दाखविली.उपस्थित मुला मुलींना उज्वल भविष्या साठी शुभेच्छा दिल्या.आभार वासंती चौधरी व सुत्र सचलंन पंकज जैन यांनी केले या प्रसंगी अध्यक्ष अनिल चोरडीया, राजुभाई श्रॉफ, विजय साखंला, राजेश भंडारी, मनिष वर्मा, निरज साखंला , कल्पक साखंला, सम्यक जैन, बालसुधार गृह आधिक्षक जयश्री पाटील व इतर उपास्थित होते.