जळगाव दि.२५ जुन २०२४ : देशात आणीबाणी लागू करून काँग्रेस पक्षाने काळा इतिहास रचला आहे. तीच काँग्रेस आज संविधानाची भाषा करीत आहे.असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.यावेळी महानगराध्यक्ष उज्वला बेंडाळे,मुविकोराज कोल्हे, माजी नगरसेवक उदय भालेराव,मनोज भांडारकर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना जळकेकर महाराज म्हणाले की,देशात आणीबाणी लागू करण्याच्या घटनेस आज पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करून संविधानाचा गळा घोटला होता.आज तेच संविधानाचा कळवला दाखवीत आहेत.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकीत पराभव घडविणारी हीच काँग्रेस आहे. डॉ.आंबेडकरांचे वर्चस्व यांना कधीच मान्य झालेले नाही.आता संविधान धोक्यात असल्याचे ते पसरवीत आहे.मात्र जनतेने त्यांना निवडणुकीच्या माध्यमातून जागा दाखवून दिली आहे.
यावेळी उदय भालेराव यांनी मनोगत व्यक्त केले व आणीबाणीच्या काळातील आठवणी सांगितल्या.
उदय भालेराव यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.