जळगावसांस्कृतिक
जळगावात आजपासुन विश्वातील पहिले अखिल भारतीय श्री शिवचरित्र साहित्य संमेलन
२६ जुन ते २९ जुन सलग चार दिवस भरगच्च कार्यक्रम
जळगाव दि.२६ जुन २०२४ : यंदा २०२४ हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वर्ष पूर्ण होत आहेत. याच प्रसंगाचे औचित्य साधून दि. २६ जून ते २९ जून २०२४ दरम्यान जळगाव येथे नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणावरती विश्वातील पहिले श्री. शिवचरित्र साहित्य संमेलन सुरू होत आहे.यात २६ तारखेला दुपारी प्रदर्शनी उदघाटन व रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजिय करण्यात आलेला आहे.
यात प्रदर्शनात शस्त्र प्रदर्शन,शस्त्र प्रशिक्षण,
पुस्तक प्रदर्शन,चित्र प्रदर्शन नाणी प्रदर्शन,आरमार प्रदर्शन,
रणांगण खेळ,पगडी प्रदर्शन,मराठ्यांची धारतीर्थ,शिवराई,विरगळ प्रदर्शन,
रात्री ८ वाजता आंतरराष्ट्रीय स्तरावर जागरण गोंधळ सादर करणारे सादरकर्ते रामदास कदम, परभणी हे सादर करणार आहेत.