लोकमाध्यम न्युज | जळगाव दि.२९ जुन २०२४ |
जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटी तर्फे येणाऱ्या विधानसभा निवडणुकी बाबतीत तालुका अध्यक्ष मनोज डिगंबर चौधरी व तालुक्याचे विधान सभा निरीक्षक विजय महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यामध्ये यापुढे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हा जळगाव ग्रामीण मतदारसंघ काँग्रेसला मिळावा अशी एक मुखी मागणी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी यांनी प्रभारी यांच्या कडे केली.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीबाबत तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना आघाडी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने वागणूक दिली ती अतिशय चुकीची होती. त्यांच्या चुकीच्या नियोजनामुळेच आघाडी पक्षातील उमेदवाराचा प्रभाव झाला असे स्पष्ट आरोप तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी प्रभारी यांच्यासमोर मांडले.
आजपर्यंत जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ जेव्हापासून अस्तित्वात आला तेव्हापासून जळगाव ग्रामीण मतदार संघ हा आघाडी धर्मामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला आलेला आहे. यापूर्वी तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने इथून उमेदवार दिला व 2009 च्या निवडणूक सोडून दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार इथून पराभूत झालेला आहे. तरी तीन वेळा आघाडीधर्म पाळुन काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मदत केलेली आहे. तरी यापुढे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा अशी एक मुखी मागणी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी यांनी प्रभारी यांच्या कडे केली.
त्या अनुषंगाने तालुक्याचे प्रभारी यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या मागील निवडणुकीबाबत व येणाऱ्या निवडणुकी संदर्भात सर्वांच्या व्यथा पक्षश्रेष्ठींकडे मांडून जळगाव ग्रामीण मतदार संघ हा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला कसा मिळेल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आघडी धर्म पाळण्याची जबाबदारी एकट्या काँग्रेस ची नाही असेही प्रभारी म्हणाले आघाडीत राहून जर काँग्रेस पक्षाचे नुकसान होत असेल तर एकला चलो चा नारा यावेळी देण्यात आला. सदर बैठकीमध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवार म्हणून सुभाष सांडू पाटील जळके व जळगाव ग्रामीण तालुकाध्यक्ष मनोज डिगंबर चौधरी यापैकी एका व्यक्तीने जळगाव ग्रामीण विधानसभेची उमेदवारी करावी अशी एकमुखाने मागणी करून ठराव पारित करण्यात आला. सदर बैठकीसाठी तालुका प्रभारी विजय महाजन तालुकाध्यक्ष म्हणून डिगंबर चौधरी ,उपाध्यक्ष रवी सोनवणे सुभाष सांडू पाटील, संदीप वाघ, सुभाष भंगाळे,नरेंद्र सपकाळे, प्रमोद पाटील, विनायक सूर्यवंशी, दिलीप घोलप, नशिराबादचे अध्यक्ष अजित मोमीन ,मुश्ताक मोमीन ,निशा फेगडे असे तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.