जळगावशैक्षणिकसामाजिक

आर्टिफिशीयल इंटेलिजन्सचा शिवसाहित्याला मोठा धोका : सुरेश चव्हाणके

अखिल भारतीय श्री शिवचरित्र साहित्य संमेलनाचा समारोप

लोकमाध्यम न्युज | जळगाव दि.३० जुन २०२४ |
छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर भारतावर अनेक राजसत्ता आल्यात. त्यांनी लुटमार केली. अनेक वास्तू,वस्तू आणि साहित्य नष्ट केले. पंरतु त्यातूनही शिवरायांचे साहित्य सहीसलामत आहे. कारण शिवरायांची शत्रूला इतकी जरब होती की त्यांच्या नावानेच ते गर्भगळीत होत. परंतु आता या अस्सल शिवसाहित्याला आर्टिफिशीयल इंटेलिजन्सचा मोठा धोका निर्माण झाला आहे. हा धोका टाळण्यासाइी या शिवसाहित्याच्या अनेक प्रति तयार व्हाव्यात. पुढील शिव साहित्य संमेलन दिल्लीत व्हावे अशी अपेक्षा सुदर्शन टिव्हीचे संपादक सुरेश चव्हाणके यांनी व्यक्त केले.

नूतन मराठा महाविद्यालयात इतिहास प्रबोधन संस्था व नूतन मराठा महाविद्यालय यांच्या सहकार्याने 26 जून पासून सुरू असलेल्या विश्वातील पहिल्या अखिल भारतीय शिवचरित्र साहित्य संमेलनाच्या समारोपाप्रंसगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवाजी महाराजांचे नागपूर गादी चे वंशज श्रीमंत उधोजी राजे भोसले, केदार फाळके (सांगली), पिपल बँकेचे चेअमरन अनिकेत पाटील, संमेलनाच्या कार्याध्यक्ष्ाा डॉ. केतकी पाटील, निमंत्रक प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख, इतिस प्रबोधन संस्थेचे विश्वस्त डॉ. रवींद्र पाटील सचिव भारती साठे उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुदर्शन टिव्हीचे संपादक सुरेश चव्हाणके म्हणाले की, जगन्नाथ पुरी मध्ये होत असलेली विश्वातील सर्वात मोठी रथ यात्रा मुस्लीमांच्या दबावामुळे बंद करण्यात आली होती. परंतु ती पुन्हा भव्य दिव्य स्वरुपात सुरू करण्याचे श्रेय जर कोणाला जात असेल तर ते नागपुरच्या श्रीमंत उधोजी राजे भोसले परिवाराला. एवढेच नाही तर भोसले परिवाराने या मंदिराचे पुननिर्माणही केले होते. तेथे अनेक खांबाचा पुल आहे तो तयार करण्याचे कामही भोसले परिवाराने तयार केले आहे.

खान्देश नाही कान्हदेश म्हणा
सुदर्शन टिव्ही.चे सुरेश चव्हाणके म्हणाले की, हा खानदेश नाही तर कान्हदेश आहे. हा कान्हाचा देश आहे. याला खान देश म्हणण्याचे पाप करू नका. महाराष्ट्र सरकारला विनंती करेल की खानदेशाला खानदेश न संबोधता कान्हदेश म्हणून संबोधीत करून तशी नोंद करा. मूळत: खान हे नाव मुस्लिम नाही.

शाहरुख, सलमानला आवाहन

ते म्हणाले की, मी आवाहन करतो शाहरुख खान आणि सलमान खान यांना की त्यांनी त्यांचे खान हे नाव मुस्लिम असल्याचे सिध्द करावे. मी त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे. राजा चंगेज खान चायनाच्या मगोजहून आला होता. पण तो मुसलमान नव्हता. तो चंगे खान इथे आला, काही लुटेरे आले, काही स्थानिक लोक ही तलवारीच्या धाकामुळे मुसलमान झालेत. त्यांनी खान नाव लावले. खान नावाचा इस्लामशी कोणताही सबंध नाही आणि खान्देशाशी तर मुळीच नाही. त्यामुळे आता खानदेश हे नाव राहणार नाही. छत्रपती शिवरायांच्या साहित्यावर विश्वातील पहिले साहित्य संमेलन होत आहे. दिल्लीत नवीन सरकार बनले आहे. केंद्र सरकारच्या संसदेचे दिल्लीत तर राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र मी शिवरायांच्या संमेलनास आलो आहे.

साहित्यिकांमुळे शिवसाहित्याचा टिकाव
350 वर्षानंतर एका राजाच्या नावाने साहित्य संमेलन होत आहे. शिवरायांशिवाय दुसरा कोणता राजा आहे का की ज्याच्या नावाने संमेलन होत आहे. राजा अशोक सम्राट, ज्याच्या नावाने भारताचे नाव ठेवले गेले तो भारत राजा यांचेही अस्तित्व संपले आहे. त्यांची जयंती पुण्यतिथी कोणालाच माहिती नाही. परंतु 350 वर्षापर्यंत शिवरायांना जिवंत ठेवण्याचे काम साहित्यिकांचे आहे. ज्यांनी त्यांच्या शौर्याच्या कथा लिहील्या, कविता लिहील्या, लावण्या लिहील्या. अभंगात आहेत, किर्तनात आहेत, भाषणातही आहेत यात साहित्याचे योगदान आहे.. त्याच्यामुळेच शिवराय आमच्यापर्यंत पोहचले.

एआयचा धोका
पण आता आर्टिफिशीयलचा जमाना आहे. त्याचा या साहित्याला मोठा धोका आहे. कोणाला शिवरायांवर पुस्तक किंवा लेख लिहायचा आहे तो एआयएवर जा, गुगलवर जा दहा सेकंदात 100 ते 200 पानांचे पुस्तक तुम्हाला तयार मिळेल. कारण एक पुस्तक लिहीयला एका लेखकाला ,साहित्यकाराला आयुष्य खर्ची घालावे लागते. ते काम आता आर्टिफिशीयल इंटेलिजन्सव्दारे चुटकीसरशी होत आहे. हे आव्हान आहे. कारण हे डिजीटल युग आहे. नालंदा विद्यापीठ जाळले होते. एका लाखापेक्ष्ाा जास्त सैनिकांनी त्याकाळी नालंदा विद्यापीठातील हस्तलिखीते जाळली. तरीही ते नष्ट झाली नाहीत. कारण त्याची दुसरी कॉपी होती. परंतु डिजीटल युगात जर ठरवले तर एका विशिष्ठ शब्दाला नष्ट करायचे ठरवले तर तो शब्द कायमचा नष्ट, गायब होऊ शकतो. तो मिळणारच नाही या आवाहनापासून वाचवणे गरजेचे आहे. त्यासाठी आपले साहित्य हे संकलीत करून त्याच्या अनेक प्रति तयार करून त्या देशभरात सांभाळल्या गेल्या पाहीजे. विविध माध्यमांच्या रूपातून या साहित्याची जपवणूक केली जावी. एआयच्या माध्यमातून शिवरायाच्या साहित्यात भेसळ केली जात आहे. हा धोका थांबवणे गरजेचे आहे.

भोसले वंशाचे राज्य नव्हे तर हिंदवी स्वराज्य
शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष होते. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. तेव्हा त्यांनी भोसले वंश का राज्य असे म्हटले नाही, तर हिंदवी स्वराज्य असे म्हटले ही त्यांची महानता. त्यांनी भोसले राज्य असे म्हटले असते तर त्यास कोणी टोकले असते का. त्यांनी हिंदू राष्ट्र म्हणून संबोधले. ते म्हणत हे राज्य व्हो ही श्रींची इच्छा. शिवरायांच्या अंगरक्षकांमध्ये मुसलमान होते. त्यांनी अठरापगड जातीधर्माच्या लोकांना एकत्र करून राज्याची स्थापना केली. शिवरायांचा खोटा इतिहास इतका रेटून सांगितला जात आहे की अफजलखान शिवरायांना सुरा मारायला आलाच नव्हता. तर तो त्यांना गळाभेट घेण्यासाठी आला होता. त्यांच्या या वाक्याला मूर्ख नेता कोटही करतील. शिवरायांना मारण्यासाठी अफजलखान आला होता हे हे निर्विवाद सत्य आहे. शिवरायांच्या इतिहासात आता मिलावट केली जात आहे ती रोखण्यासाठी आता अभियान चालविले पाहीजे.

पुढील संमेलन दिल्लीत व्हावे
पुढील साहित्य संमेलन दिल्लीत व्हावे. कारण दिल्लीत सर्वाधिक राज्य मराठ्यांचे होते आणि दिल्लीची भाषाही मराठी होती. प्रशासकीय भाषा मराठी होती. त्यामुळे पुढील संमेलन दिल्ली व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रमुख अतिथी केदार फाळके यांनीही शिवसाहित्यावर त्यांचे मनोगत व्यक्त केले.
लोकसहभागातील पहिले संमेलन
शिव चरित्रावर लोकसहभागातून प्रथमच साहित्य संमेलन होत आहे. यासाठी अनेक शिवप्रेमींनी मदत केली आहे. शिव चरित्राचा हा ठेवा पुढील पिढीला हस्तांतरीत करण्यासाठी हे संमेलन पुरक ठरेल असा विश्वास इतिहास प्रबोधन संस्थेचे विश्वस्त डॉ. रवींद्र पाटील यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केला. सूत्रसंचालन महेश कौडिण्य यांनी केले. आभार निमंत्रक प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख यांनी मानले.
संमेलन यशस्वीतेसाठी सहकार्य नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य, महाविद्यालयातील एन.सी.सी. विभाग, एन. एस. एस. विभाग महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button