लोकमाध्यम न्युज | जळगाव दि.३ जुलै२०२४ | येथील महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात नवीन सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यात आले आहे. मात्र गेल्या आठ दिवसापासून त्यात तांत्रिक बिघाड आल्याने दाखले देण्याचे काम संथगतीने सुरू आहे.
महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात नवीन सॉफ्टवेअर टाकण्यात आले आहे. त्यानुसार जन्म-मृत्यूचे दाखले देण्याचे काम गतीने होत होते. दिवसाला किमान 100 दाखले देण्यात येत होते.
आठ दिवसापासून तांत्रिक बिघाड
दरम्यान गेल्या आठ दिवसापासून सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे सॉफ्टवेअर संथ गतीने चालत आहे. जन्म -मृत्युचे डॉक्युमेंटस स्कॅन करून ते या नवीन सॉफ्टवेअरवर अपलोड होत नाही. त्यामुळे एक दाखला देण्यास दोन ते तीन तास वेळ लागत आहे.
कर्मचारी,नागरीक त्रस्त
जन्म-मृत्यूचे दाखले घेण्यासाठी आलेल्या नागरीकांसह कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. सॉफ्टवेअरच्या तांत्रिक बिघाड दूरूस्त करण्याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
नागरीकांना पाठवले जाते परत
सॉफ्टवेअरच्या तांत्रिक बिघाडामुळे विभागात येणाऱ्या अनेक नागरीकांना परत पाठवले जात आहे. दाखले देण्यास विलंब लागत असल्याने नागरीकांमधून महापालिकेच्या कारभाराबाबत तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.