लोकमाध्यम न्युज | जळगाव दि.५ जुलै२०२४ |
निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टर्स डे निमित्ताने जळगाव शहरातील वैद्यकीय क्षेत्रात गरीब आणि गरजू रुग्णांसाठी निःस्वार्थ वृत्तीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निःस्वार्थ डॉक्टरांचा नुकताच सन्मान करण्यात आला.
यावेळी गौर गरिबांसाठी मोफत वैद्यकीय सेवा देणारे गरिबांचे कैवारी निःस्वार्थ व्यक्तिमत्व व खास गरिबांसाठी माफक दरात वैद्यकीय सेवा देणारे सर्वांग क्लीनिक चे संचालक डॉ.तिलक नारखेडे ,डॉ.नम्रता नारखेडे यांचा
तसेच आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवा च्या माध्यमातून अनेक बाळांना जीवनदान देणारे पेडियाट्रिक सर्जन डॉ.वरुण सरोदे व वर्षा सरोदे यांचा आणि गोर गरीब महिलांसाठी आरोग्य क्षेत्रात निःस्वार्थ वृत्तीने करणारे गीताई हॉस्पिटल चे डॉ.नरेश नारखेडे,डॉ निलेश चांडक,डॉ.संजू चौधरी,डॉ.भावना चौधरी यांचा सन्मान निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान च्या वतीने गीता जावळे धीरज जावळे,पूनम भाटिया,यांच्या शुभ हस्ते राम नामाची शॉल व पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले यावेळी प्रतिष्ठान चे शारदा सोनवणे, धनंजय सोनवणे, सतीश जावळे,बभु भैया जावळे व संस्थेचे संस्थापक अविनाश जावळे उपस्थित होते.