जळगावसामाजिक

सामाजिक बांधिलकीतून नम्रतेने काम करा : निशा जैन

इनर व्हिल क्लब ऑफ जळगावचा पदग्रहण सोहळा संपन्न

इनर व्हिल क्लब ऑफ जळगाव जिल्हा ३०३ चा पदग्रहण सोहळ्याप्रसंगी सौ. उषा जैन यांना अध्यक्ष पदाची बॅज पिनिंग करताना डॉ. रितु कोगटा, डॉ. मयुरी पवार, सौ. निशा जैन, सेक्रेटरी निशिता रंगलानी आदी.

लोकमाध्यम न्युज | जळगाव दि.५ जुलै२०२४ |

सामाजिक बांधिलकीतून नम्रतेने काम करा- सौ. निशा जैन

आपण समाजाकडून भरपूर घेत असतो ते सामाजिक बांधिलकीतून नम्रतेने सर्वसामान्यांना परत केले पाहिजे. नाविन्यता व कल्पकतेतून इनर व्हिल क्लबच्या उद्दिष्ट्यांची पेरणी समाजात करायची आहे. ही जबाबदारी विद्यमान अध्यक्ष उषा जैन यांच्यासह महिलांच्या टिमवर्कच्या माध्यमातून यशस्वी करतील व मैत्रभावनेतून प्रत्येक उपक्रम राबविला जाईल, असे प्रमुख अतिथी म्हणून अनुभूती निवासी स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन यांनी प्रतिपादन केले.

इनर व्हिल क्लब ऑफ जळगाव जिल्हा ३०३ चा पदग्रहण सोहळा सौ. निशा जैन यांच्या प्रमूख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर इनर व्हिल क्लबच्या मावळत्या अध्यक्ष डॉ. रितु कोगटा, सचिव डॉ. मयूरी पवार, नवनियुक्त अध्यक्ष सौ. उषा जैन, सचिव निशिता रंगलानी उपस्थित होत्या.

मान्यवर उपस्थितांसह माजी अध्यक्ष नुतन कक्कड, संगिता घोडगावकर, मिनिल लाठी यांच्याहस्ते दीपप्रज्वलन झाले. उषा जैन अध्यक्ष पदासाठी तर सचिवपदासाठी निशिता रंगलानी यांना बॅज पिनिंग पदाधिकारींच्या उपस्थित झाले. २०२४-२०२५ करिता निवड झालेल्या कार्यकारिणीची घोषणा सौ. उषा जैन यांनी केली.

कोषाध्यक्ष गुंजन कांकरिया, आयएसओ रूचि चांदिवाल, सीसी रंजन शहा, सीसीसी डॉ. शितल अग्रवाल, कार्यकारिणी सदस्य दिप्ती अग्रवाल, साधना गांधी, ज्योत्स्ना रायसोनी, संध्या महाजन, शैला कोचर, सल्लागार नुतन कक्कड, निता जैन यांची निवड करण्यात आली. निशा जैन यांच्यासह अध्यक्ष, सचिवांच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला. डॉ. मयूरी पवार यांनी आभार मानले. दिप्ती अग्रवाल, निकिता मयूर अग्रवाल यांनी सूत्रसंचालन केले.. डॉ. रितु कोगटा यांनी मागील दोन वर्षात इनर व्हील क्लब ने केलेल्या कार्याचा आढावा घेत नविन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्यात. डॉ. मयुरी पवार, निशिता रंगलानी यांनीही मनोगत व्यक्त केले.


गुणवत्तापूर्ण उपक्रमांवर भर देणार – सौ. उषा जैन
संख्यात्मकदृष्ट्या विचार न करता गुणवत्तापूर्ण उपक्रमावर भर देणार असून इनर व्हिल क्लबच्या अध्यक्षपदामुळे जबाबदारी वाढली आहे. आज पहिल्याच दिवशी सायकल वाटप, आर्थिकदृष्ट्या आवश्यकता असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक मदत करण्याची घोषणा नवनियुक्त अध्यक्षा उषा जैन यांनी केली.
इनर व्हिल क्लबचा लोगो आलेल्या पदाधिकारी व पाहुण्यांच्या वाहनांवर लावण्यात आला.

 

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button