तत्कालीन आयुक्तांची होती ५ लाखाची मागणी : माजी शहर अभियंत्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
लोकमाध्यम न्युज | जळगाव दि.६ जुलै२०२४ |
जळगाव महानगरपालिकेच्या तत्कालिन आयुक्त विद्या गायकवाड यांनी दहा महिन्याचे वेतन अदा करण्यासाठी ५ लाखांची मागणी केल्याचा गंभिर आरोप तत्कालिन शहर अभियंता अरविंद भोसले यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केलेल्या लेखी तक्रारीतून केला आहे.
तक्रारीत नमुद करण्यात आले की, तत्कालिन मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी यांची तक्रार नगरविकास विभागाकडे केल्यामुळे त्याचा राग मनात ठेवून सतिष कुलकर्णी यांनी ते सेवानिवृत्त होण्याच्या दोन दिवस पुर्वी सहा. अभियंता अरविंद भोसले यांना बडतर्फ केले होते. त्यानंतर भोसले यांनी आपली नियमबाह्य झालेली बडतर्फी रद्द करून बडतर्फीच्या काळातील दहा महिन्यांचे वेतन मिळावे असे अपील स्थायी समितीकडे केले होती. स्थायी समितीने अपील मान्य करून बडतर्फी रद्द करण्याचा ठराव केला. परंतु प्र.आयुक्त विद्या गायकवाड यांनी १० महिने स्थायी समितीच्या ठरावाची अंमलबजावणी केली नाही व त्रयस्थ व्यक्तीमार्फत भोसलेंकडे ५ लाखांची मागणी केली. त्यास भोसले यांनी नकार दिल्यामुळे आयुक्तांनी सदर दहा महिन्यांचे वेतन देण्याची तयार केलेली टीपणी रद्द करून नवीन टीपणी तयार केली, त्यामध्ये भोसले यांच्या दहा महिन्याचा कालावधी असाधारण रजा धरण्यात येत असून त्या कालावधीमधील वेतन व भत्ते देय असणार नाही, असे नमुद केले असा आरोप भोसले यांनी केला आहे. तसेच आपण सर्व कागदपत्रांची पुतर्ता केल्यानंतरही त्यांना पेंशन लागू करण्यात आलेली नाही, अशी तक्रार भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी स्वरुपात केली आहे. तसेच विद्या गायकवाड यांनी ५ लाखांची मागणी केल्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे केली असल्याचेही भोसले यांनी नमुद केले आहे.
नवीन आयुक्तांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असावा
दरम्यान याबाबत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून बदली झालेल्या डॉ. विद्या गायकवाड यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता आता माझी बदली झाली असल्याने त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य होणार नाही. मात्र नीवन आयुक्तांवर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न असावा असे वाटते.
डॉ. विद्या गायकवाड, सह आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपुर