जळगावसामाजिक

जैन इरिगेशनच्या सहकार्यातून १००० झाडांची लागवड

वनमहोत्सवात सुरत रेल्वे गेट ते निमखेडी रस्त्याने झाडे जगविण्याचा घेतला ध्यास

लोकमाध्यम न्युज | जळगाव दि.७ जुलै२०२४ |

जैन इरिगेशन सिस्टीम्स व सामाजिक वनिकरण विभाग जळगाव, हरीत सेना, म्हाडा कॉलनी, निमखेडी रोड परिसर, संत सावता नगर परिसर, चंदु अण्णानगर, कांताई नेत्रालय, चेतना व्यसनमुक्ती केंद्र, शिवम नगर मित्र मंडळ यांचे सौजन्याने वनहोत्सव कार्यक्रमाअंतर्गत वेस्टर्न रेल्वे सुरत रेल्वे गेट क्रॉसींग समोरुन निमखेडी रोडने १००० हून अधिक निंब, वड, पिंपळ, करंज, बहुळा, कदम, चिंच, जांभूळ यासह स्थानिक मातीत वाढणारी झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली.

वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात मनपा आरोग्य अधिकारी तथा ग. स. सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील, मनिषा उदय पाटील यांच्याहस्ते झाड लावून झाली. यावेळी सामाजिक वनिकरण विभागाच्या रोहिणी सोनार, राजेंद्र राणे, वन विभागाच्या अश्विनी ठाकरे, जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी सी. एस. नाईक, सौ. संगिता नाईक, ॲड. सुनील खैरनार, जे. एम. तापडिया, अनिल जोशी, संजय ठाकरे, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे मदन लाठी, डॉ. नितीन विसपूते, हरित सेनेचे प्रविण पाटील, शिवमनगरचे अनिल पाटील व सहकारी, वसंत पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव प्रकाश पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. ‘एक दिवस वसुंधरेसाठी देऊया, झाडे लावून, झाडे जगवूया’ या संकल्पातून जैन इरिगेशनने हा उपक्रमासाठी विशेष सहकार्य उपलब्ध करुन दिले. श्रीनाथजी हाउसिंग सोसायटी मधील हरिष लुंकड, गिरीष लुंकड, विजय तिवारी, मनोज देशमुख, स्वाती देशमुख यांच्यासह लहान मुलांनी व जैन इरिगेशनचे आर. एस. पाटील, संजय साळी, देवेंद्र पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सक्रिय सहभाग घेतला. मालधक्क्यावरील हमाल बंधूंनीही वृक्षारोपणात सहभाग घेत सावलीसाठी झाडे लावली.

सी. एस. नाईक यांनी सांगितले की, ‘जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी वृक्षारोपण मोहिमेला विशेष मार्गदर्शन केले असून त्यांच्याच सहकार्यातून आज वृक्षारोपण केले जात आहे. विद्यार्थ्यांसह आपण प्रत्येकाने उरलेले पाणी फेकून न देता एखाद्या झाडाला टाकले तर ती सहज वाढतील. आणि वाढलेले तापमान नियंत्रणात आणण्यास मदत करतील आणि आपले भविष्य सुकर करतील. प्रत्येकाने फक्त फोटो काढण्यापूरते झाडे लावू नये ती जगवली पाहिजे.

दरम्यान ग. स. सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील यांनी वृक्षारोपण उपक्रमास मनपास्तरावर पूर्ण सहकार्य असल्याचे सांगितले. झाडांची निगा राखली जावी यासाठी १०० ट्रि गार्ड स्वत: लावणार असल्याचे जाहिर केले. राजेंद्र राणे, वसंत पाटील, प्रविण पाटील, डॉ. नितीन विसपूते, प्रकाश पाटील यांनीही मनोगत व्यक्त करुन झाडे जगविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button