उन्मेश पाटील यांचे जळगावात धरणे आंदोलन…
कष्टकरी शेतकरी बळीराजांच्या मागण्यांसाठी महविकास आघाडीतर्फे आयोजन
लोकमाध्यम न्युज | जळगाव दि.९ जुलै२०२४ |
जळगांव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी तर्फे मा. खा. उन्मेश पाटील यांच्या संकल्पनेतुन व महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या नेतृत्वात दि. १० जुलै बुधवार रोजी सकाळी १० वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव येथे धरणे आंदोलन करन्यात येणार आहे.
दुधाला ३० रू. प्रति लिटर भाव ५ रू प्रति लिटर चा फरक तात्काळ सर्व शेतकऱ्यांना व दुध उत्पादकांना देण्यात यावा. यामध्ये जळगांव जिल्हयात मागील कालावधीत जळगांव सहकारी दूध उत्पादक संघामार्फत सादर न झालेले प्रस्तावांना देखील ५ रू. लिटरचे अनुदान मंजूर करावे.
जळगांव जिल्ह्यातील ६६८६ केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळी पिक विमा नुकसान भरपाई शासनाने मंजूर केलेले असुन याबाबत शासन निर्णयाप्रमाणे अंतिम अधिकार असलेल्या मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षते खालील पिक विमा तक्रार निवारण समितीने मंजूरी देवून देखील राज्य सरकारने शेतकऱ्यांवर केलेल्या अन्याया बाबत दखल घेवून तात्काळ नुकसान भरपाई मंजूर करावी.
जळगांव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर झालेले अनुदान कुठलेही निकष न लावता सरसरकट सर्व कापुस उत्पादक शेतकऱ्यांना अदा करण्यात यावे.
शासनाने ज्वारी खरेदी केंद्र सुरू केलेले असुन परंतु त्यांचा लक्षांक कमी असल्याने शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी होत नाही. तसेच ज्वारी साठवणे साठी गोदाम उपलब्ध नसल्याने ज्वारी खरेदी होऊ शकत नाही. असे उत्तर बळीराजाला मिळत असल्याने तात्काळ सरसकट ज्वारी खरेदी सुरू करावी.आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे…