जळगावराजकिय

मागण्या मान्य होईपर्यंत महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन सुरूच राहील : माजी खा.उन्मेश पाटील यांचा एल्गार

जिल्हयातीलजळगाव शेतकरी,कार्यकर्ते,पदाधिकारी यांची जोरदार घोषणाबाजी

लोकमाध्यम न्युज | जळगाव दि.१० जुलै२०२४ |

दूध, केळी, कापूस, ज्वारी खरेदी आदी मागण्यांवर सरकारने ठोस उत्तर द्यावे – महाविकास आघाडीचा निर्धार

जिल्ह्यात शेतकरी बांधवांसह विविध घटकांच्या विविध समस्या, अडचणी मागण्यासंदर्भात वेळोवेळी महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका घेऊन तसेच तोंडी, लेखी स्वरूपाचे निवेदन देऊन देखील अद्याप शेतकरी बांधवांच्या मागण्या संदर्भात शासनाची बोटचेपी भूमिका असल्याने शेतकरी त्रस्त झाला असून बळीराजांच्या मागण्या मान्य होईपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहणार असून जिल्हयात तिन मंत्री असताना शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात असताना महाविकास आघाडी बघ्याची भुमिका घेणार नसून सरकारने ठोस उत्तर दिल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही असा निर्धार जळगाव लोकसभा मतदारसंघाचे मा. खासदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केलाआहे.

महाविकास आघाडीच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या धरणे आंदोलनात खासदार उमेश दादा पाटील बोलत होते यावेळी माजी मंत्री सतीश अण्णा पाटील,गुलाबराव देवकर, दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांनी आंदोलन स्थळी आलेल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली. अधिकारी निरुत्तर झाल्याने नेत्यांनी अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करीत शेतकऱ्यांचे पुत्र म्हणून तरी जबाबदारी पार पाडावी अशी अपेक्षा व्यक्त करुन राज्याच्या सचिवांशी बोला त्याशिवाय धरणे आंदोलन आम्ही सुरूच ठेवणार आहोत. असा निर्धार व्यक्त करीत प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.

चार प्रमुख मागण्या

1) दुधाला रू.30/- प्रति लिटर भाव व रू.5/- प्रति लि. चा फरक तात्काळ सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावा. यामध्ये जळगाव जिल्ह्यात मागील कालावधीत जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत सादर न झालेले प्रस्तावांना देखील रु.5/- प्रति लिटर चे अनुदान मंजूर करावे.
2) जळगाव जिल्ह्यातील 6686 केळी उत्पादक शेतकऱ्यांचा केळी पिक विमा नुकसान भरपाई शासनाने नाम मंजूर केलेले असून याबाबत शासन निर्णयाप्रमाणे अंतिम अधिकार असलेल्या मा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील पिक विमा तक्रार निवारण समितीने मंजुरी देऊन देखील राज्य सरकारने शेतकऱ्यांवर केलेल्या अन्यायाबाबत तात्काळ नुकसान भरपाई मंजूर होणे बाबत.
3 ) जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर झालेला अनुदान कुठलेही निकष न लावता सरसकट सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अदा करण्यात यावे.
4) शासनाने ज्वारी खरेदी केंद्र सुरू केलेल्या असून परंतु त्याचा लक्षात कमी असल्याने शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी होत नाही तसेच ज्वारी साठवणे साठी गोदाम उपलब्ध नसल्याने ज्वारी खरेदी होऊ शकत नाही असे उत्तर मिळत असल्याने तात्काळ सरसकट ज्वारी खरेदी सुरू करावी.
वरील मागण्या मान्य होईपर्यंत जळगाव जिल्हा महाविकास आघाडीचे सर्व नेते,कार्यकर्ते, पदाधिकारी शेतकरी संघटना समविचारी पक्ष आणि संस्था धरणे आंदोलन करणार आहेत.
याप्रसंगी मागण्या मान्य होईपर्यंत धरणे आंदोलन संपुष्टात येणार नाही असा निर्धार केला असून कुंभकर्णी झोप घेत राज्य शासनाला वठणीवर आणण्यासाठी एल्गार पुकारला आहे. असा निर्धार माजी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.
यावेळी माजी मंत्री सतीशअण्णा पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी खासदार उन्मेशदादा पाटील, जिल्हा सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, माजी महानगर प्रमुख गजानन मालपुरे, वैशालीताई सूर्यवंशी, जयश्री महाजन, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा दूध संघ संचालक प्रमोद पाटील, जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने, जिल्हाप्रमुख दीपक राजपूत,पारोळा माजी नगराध्यक्ष करणदादा पवार, जि प सदस्य नानाभाऊ महाजन,उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष वाल्मीक पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, नगरसेवक सुनील महाजन, काँग्रेस चे प्रदेश प्रतिनिधी अशोक खलाणे, चाळीसगांव तालुका अध्यक्ष अनिल बापू निकम, पोहरे सरपंच बापू माळी,चाळीसगाव तालुकाप्रमुख रमेश आबा चव्हाण, शिवशक्ती भीमशक्तीचे सुधाकर मोरे,ज्येष्ठ नेते के आर आण्णा पाटील, शेतकरी संघटना विभागीय सचिव संदीप पाटील, गायत्री सोनवणे, सविताताई कुमावत, युवा सेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी, उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे,मार्केट संचालक डॉ. अरुण पाटील, तालुकाप्रमुख उमेश पाटील, नगरसेवक पी जी पाटील, दिलीप घोरपडे, पंचायत समिती सदस्य रवीभाऊ चौधरी, सभापती सुनील पाटील, अमळनेर तालुकाप्रमुख विजय पाटील, शहर प्रमुख चंद्रशेखर भावसार, उपजिल्हाप्रमुख देवेंद्र देशमुख, विजय लाड,धरणगाव शेतकरी सेना विजय पाटील, एरंडोल तालुका प्रमुख जगदीश पाटील, महानगर उपप्रमुख हर्षल मुंडे,शाखा प्रमुख सुरेश महाजन, समाधान पाटील, नरेन काका जैन,मुकेश गोसावी, अनिल चव्हाण, दीपक एरंडे, सोनू आहिरे,लक्ष्मण गवळी, अनिकेत गवळी, नितीन गवळी, प्रमोद गवळी, प्रशांत वाणी, प्रीतम शिंदे, विशाल वाणी, महेश ठाकूर, अमित जगताप,चेतन कुमावत यांच्यासह निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कुर्बान तडवी, दूध निबंधक वासुदेव पाटील, जिल्हा मार्केटिंग अधिकारी मगरे, पशुसंवर्धन अधिकारी इंगळे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शेतकरी,कार्यकर्ते हे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लाव रे तो व्हिडिओ
यावेळी मा.खासदार उन्मेशदादा पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना दुग्ध विकास मंत्री ना. विखे पाटील, पिक विमा बाबत मंत्री ना.धनंजय मुंडे, भावांतर योजनेबाबत ना.देवेंद्र फडणवीस ,ज्वारी खरेदी केंद्र बाबत वर्तमान पत्रात आलेल्या बातम्यांची कात्रण एलईडी स्क्रीनवर दाखवत आंदोलनाला वेगळ्या उंचीवर लिहून ठेवले.
यावेळी शेतकऱ्यांनी उन्मेशदादा यांच्या लाव रे तो व्हिडिओ उपक्रमाचे कौतुक केले.महा विकास आघाडीच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button