जळगांव जिल्हाशैक्षणिक

“संगणकाच्या युगात शिक्षकांनी स्वतःला संगणकीय दृष्टिकोनातून प्रगत करावे” – मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल

लोकमाध्यम न्युज जळगाव दि : ३ जून २०२५
“सध्याच्या डिजिटल युगात गुणवत्ता शिक्षणासाठी संगणकीय ज्ञानाची आवश्यकता आहे. त्यामुळे शिक्षकांनी स्वतःला संगणकाच्या दृष्टिकोनातून अद्ययावत करणे काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी केले.

त्या जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी आयोजित ‘कॉम्प्युटर सायन्स कोडिंग’ दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. सदर उपक्रम जिल्हा परिषद (प्राथमिक शिक्षण विभाग), Amazon Future Engineer आणि Leadership for Equity यांच्या संयुक्त विद्यमाने CSTE उपक्रमांतर्गत राबविण्यात आला.

जळगाव जिल्ह्यातील १००० पेक्षा अधिक शिक्षकांना ऑनलाईन झूम मीटिंगद्वारे या प्रशिक्षणाची प्राथमिक माहिती देण्यात आली. यात १ ली ते ८ वी पर्यंत शिकवणारे जिल्हा परिषद व मनपा शिक्षक सहभागी झाले होते.

प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये:
• या कोर्सचे नाव “Introduction to Computational Thinking & Coding (ICTC)” असून त्यामध्ये Computational Thinking संकल्पना, तसेच Scratch सॉफ्टवेअरवर कोडिंगचे प्राथमिक शिक्षण देण्यात येत आहे.
• हा कोर्स ऑनलाइन ब्लेंडेड स्वरूपात असून शिक्षकांना त्यांच्या वेळेनुसार करता येणार आहे. कालावधी – १ महिना.
• कोर्समध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
• प्रशिक्षण पूर्णतः निशुल्क असून ते शिक्षकांच्या अध्यापन गुणवत्तेत वाढ करण्यासाठी राबविण्यात आले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करनवाल यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, “संगणक व कोडिंगचा वापर करून अध्यापन अधिक प्रभावी व सृजनशील होऊ शकते. शिक्षकांनी केवळ मुलांना शिकविण्यापुरतेच नव्हे तर स्वतःचाही वैयक्तिक विकास साधावा.”
सदर प्रशिक्षणामुळे शिक्षकांना दैनंदिन अध्यापनात संगणकीय कौशल्यांचा उपयोग करता येणार असून त्याचा थेट फायदा विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

या उपक्रमासाठी शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अशा उपक्रमांद्वारे शिक्षकांच्या क्षमतेत वाढ करून शिक्षण व्यवस्थेचा स्तर उंचावण्याचा संकल्प केला आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button