सामाजिक बांधिलकी जपत शनिपेठ पोलिसांची विद्यार्थिनीस सायकल भेट
सेवाभावी उपक्रमाचे पोलिस विभागात कौतुक
जळगाव दि.११ : येथील शानिपेठ पोलिस स्टेशन हद्दीतील अकस्मात लागलेल्या आगीच्या घटनेत विद्यार्थिनीची सायकल व तिच्या पालकाची मोटासायकल जळून खाक झाल्या होत्या. विद्यार्थिनीस शिक्षणा साठी दररोज ६ कि.मी.पायी ये जा करावे लागत होते. शिक्षणा पासून वंचित राहू नये म्हणून शनीपेठ पोलीसांनी सामाजिक बांधिलकी जपत सदर विद्यार्थिनीस नवीन सायकल भेट दिली.
शनीपेठ हद्दीतील माधव नगर,सुंदर नगर येथे दिनांक ६ मार्च रोजी अकस्मात आग लागून अमोल रमेश जंगले यांची होंडा ड्रीम युगा मो.सा. क्र. एम.एच.,१९ बी झेड ३६८९ तसेच त्यांची मुलगी कु. अक्षरा अमोल जंगले हीची सायकल अचानक पेट घेऊन जळाल्याने नुकसान झाले होते . सदरच्या घटनेची दि ७ रोजीअमोल जंगले यांनी खबर दिल्यावरून शनी पेठ पोलिस स्टेशनला दाखल प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांचे मार्गदर्शना खाली पोहेकॉ रवींद्र परदेशी आणि पोहेकॉ. विजय पाटील करीत आहेत.
सदर प्रकरणाचे अनुषंगाने खबर देणारे अमोल जंगले यांची लहान मुलगी कु. अक्षरा हिची सायकल देखील जळाल्याने तिला का. उ.कोल्हे शाळेत दररोज ६ कि.मी. पायी जाणे-येणे करावे लागत असल्याची माहिती मिळाल्याणे पोलीस दलात आपले दैनंदिन कर्तव्य बजावित असतांनाच, पोलीसांना सामाजिक बांधिलकीचे व सौहार्दाचे देखील भान ठेवावे लागते, याच सद्भावनेतून कु.अक्षरा तिचे शिक्षणापासून वंचीत राहू नये म्हणून किंवा तिला शिक्षणात अडचण येऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक धारबळे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. रविंद्र परदेशी व पो.हे.कॉ.विजय पाटील यांचे प्रयत्नाने त्यांचे मित्र परिवार संदिप इंधाटे ,प्रकाश वाघ, ज्ञानेश्वर गावंडे, भूषण पाटील, अविनाश पाटील, बंटी राणे, गिरिष पाटील सर्व उद्योजक, एमआयडीसी, जळगाव यांचे सहकार्याने नमूद विद्यार्थीनी कु, अक्षरा अमोल जंगले हिस आज दिनांक ११/०३/२०२४ रोजी एक नवीन सायकल भेट म्हणन दिली.
शनी पेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबडे व त्यांचे सहकारी पोलीस रवींद्र परदेशी ,विजय पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत सेवाभावी उपक्रम राबविल्या बद्दल जळगाव पोलिस विभागात त्यांचे कौतुक होत आहे.