तेली प्रीमियर लीग ४ त्या पर्वाचा उत्साहात समारोप; हॉटेल स्टार पॅलेस चा संघ विजेता तर भारत प्रिंटर चा संघ उप विजेता

| लोकमाध्यम न्युज जळगांव | दि. १२ फेब्रुवारी २०२६ : तेली समाज प्रीमियर लीग च्या ४थ्या पर्वाचा समारोप उत्साहात नुकताच संपन्न झाला. तेली समाजाच्या क्रिकेट स्पर्धेचे मागील तीन वर्षांपासून यशस्वीरित्या आयोजन करण्यात येते. तेली प्रीमियर लीग चे हे चौथे वर्ष असून या पर्वाचा समारोप मान्यवरांच्या उपस्थित व उत्साहात पार पडला. सदर क्रिकेट स्पर्धा या दिनांक ५ ते ८ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या .
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव शहराचे नवनिर्वाचित उपमहापौर मनोज चौधरी हे होते.त्यांच्या समवेत हॉटेल अतिथीचे संचालक विजय चौधरी, पुरुषोत्तम चौधरी, संतोष अप्पा चौधरी, रामचंद्र चौधरी, नंदू चौधरी, डॉ.मनीलाल चौधरी, आरोग्यदूत शिवाजी पाटील, भावेश चौधरी विनोद चौधरी, भरत चौधरी, कैलास चौधरी, हितेश चौधरी, दीपक चौधरी, नितीन चौधरी, पंकज चौधरी, राहुल चौधरी, तन्मय चौधरी, चंदन वालझाडे, मयूर चौधरी आदींची उपस्थिती होती.
यावर्षी हॉटेल स्टार पॅलेस चा संघ विजेता तर भारत प्रिंटर चा संघ उप विजेता ठरला. मान्यवरांच्या हस्ते संघांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. या स्पर्धांसाठी प्रायोजकत्व उपमहापौर मनोज चौधरी व प्रदेश तेली महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी स्वीकारले होते.
कार्यक्रम यशस्वीते साठी राहुल चौधरी, जितेंद्र चौधरी, रवींद्र तायडे, सागर चौधरी, मयूर चौधरी, प्रशांत सुरळकर चेतन चौधरी, मोहित चौधरी, कुणाल चौधरी, नयन चौधरी, भिकन चौधरी, तुनेश चौधरी, आशिष चौधरी, पंकज चौधरी, उमेश चौधरी, प्रदीप चौधरी, दीपक चौधरी, विशाल पाटील, भूषण चौधरी, प्रितेश चौधरी, बंटी चौधरी, भैय्या चौधरी, मनोज चौधरी, पंकज चौधरी, विशाल चौधरी, व तेली प्रीमियर लीग च्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.





