जळगांव दि.२६ : श्री शिव कॉलनी गट नंबर 60 येथील श्री रुद्रेश्वर महादेव मंदिर येथे रंगपंचमी व फाल्गुन महिना निमित्त दह्याचा अभिषेक संपन्न झाला.
श्री रुद्रेश्वर महादेव मंदिर येथे फाल्गुन महिना निमित्त दही चे महत्व असून दह्याचा लघु रुद्र अभिषेक व महापूजा कृष्णा जोशी व त्यांचे सोबत अकरा ब्राह्मणांच्या हस्ते पूजा संपन्न झाली बारा महिन्याचे बारा प्रकारचे विहीर द्रव्य अभिषेक असतात त्यापैकी फाल्गुन महिना निमित्त दह्याचा अभिषेक संपन्न झाला.
लघु रुद्र अभिषेक साठी गट नंबर 60 शिव कॉलनी श्री गुरुदत्त विकास बहुउद्देशीय मंडळ व सर्व संचालक मंडळ व संपूर्ण शिव कॉलनी परिसर यांचे सहकार्य लाभले.