आयुक्त मॅडम यांनी शब्द पाळला : माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांना आले प्रत्यंतर
जिल्हाधिकारी तथा जि.प.सी.ई.ओ.साठी दिल्या शुभेच्छा
जळगाव दि.२७ : जळगाव शहर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक यांनी एक वर्षांपूर्वी दिलेला शब्द आज पाळला, याचे प्रत्यंतर मेहरून चे माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांना आले. ह्या सुखद आणि गोड अनुभवाचे वर्णन त्यांनी त्यांच्याच शब्दात केले आहे ते पुढील प्रमाणे.
विषय खूप मोठा नाही आहे पण माझ्यासाठी खूप मोठा आहे. मी मॅडमाना प्रभागामध्ये व्हिजिटला आले असता चहा पाण्याला माझ्या घरी बोलविले होते. पण स्थानिक राजकारणा मुळे मॅडमानी सांगितलं होत मी ज्या वेळेस माझी जळगावतून बदली होईल . त्यावेळेस तुमच्या घरी भोजनाला नक्की येईल तुमच्या घरूनच मी दुसऱ्या ठिकाणी रुजू होईल तो शब्द आज खरा ठरला. मी धन्यवाद देतो मा, आयुक्त डॉ. विद्याजी गायकवाड मॅडमानी आज माझ्या घरी भोजनाचा व सत्कार स्वीकारल्या बद्दल मी मॅडमाचे मनस्वी आभार मानतो. आणि पुन्हा मॅडम यांना जळगाव जिल्हाधिकारी किंवा जिल्हा परिषद सि.ओ या पदासाठी पुन्हा जळगाव जिल्ह्यात यावे हीच मॅडमाना शुभेच्छा.