भारत रत्न डॉ.बाबासाहेबांना १३३ व्या जयंती निमित्त मध्यरात्री जळगावकरांचे जल्लोषात अभिवादन
जयभीम ध्वज फडकवित आ.राजुमामांनी पुष्पहार केला अर्पण
जळगांव दि. १४ : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न, महामानव, करोडो दिन दलीत
दुबळ्यांचे आराध्य दैवत परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त जळगावातील हजारो नागरिकांच्या जनसागराने मध्यरात्री १२ वाजता जबतक सूरज चांद राहेगा तब तकबाबा.तेरा नाम रहेगा चा जयघोष व जल्लोष करीत अभिवादन केले.
शहरातील रेल्वेस्थानकाच्या समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर शनिवारी रात्री १२ वाजता फटाक्यांची आतषबाजी करीत अभिवादन करण्यात आले. उत्सव समितीतर्फे या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आली आहे.
बाबासाहेबांच्या १३३ व्या जयंती निमित्ताने हजारो आंबेडकर प्रेमी युवकांनी डीजे व ढोलताशांच्या गजरात हातात निळे ध्वज मिरवीत गगनभेदी जयघोषात अभिवादन केले. युवकांचा प्रचंड उत्साह, अबाल, वृद्ध, पुरुष, स्त्रिया, युवती यांची गर्दी जोडीला लेझर किरणांचाशो, विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी यामुळे रेल्वे स्टेशन बाहेरील बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्या समोर चैत्यभूमी अवतरल्याचे वातावरण निर्माण झाले होते.
मनपाच्या क्रेन च्या साहाय्यानेआ.राजू मामा भोळे यांनी जय भीम ध्वज फडकावित गुलाबपुष्पहार केला अर्पण केला.या प्रसंगी आकर्षक व.नयनरम्य सजावट केलेला सोहळा आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी युवकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. रात्री उशिरापर्यंत जळगांवकरांनी परिसरात प्रचंड संख्येने गर्दी केली होती. जळगांव पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .