परिवर्तन च्या वतीने आखाजी पहाट संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन

| लोकमाध्यम न्यूज जळगांव दि. २९ : आखाजी हा सण खानदेशातील सगळ्यात मोठा सण आहे. कृषी जनसंस्कृतीपरंपरेषी पक्की नाळ जोडला गेलेला हा सण हजारो वर्षांपासून गाव गाड्या मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
खानदेशातील लोकपरंपरा खानदेशातील संस्कृती, खानदेश ससाहित्य अशा सगळ्यांना घेऊन ते रंगमंचावर आणत खानदेशी संस्कृतीची ओळख महाराष्ट्राला व्हावी यासाठी परिवर्तन नेहमीच वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत.
आपल्या खानदेशी संस्कृतीत आखाजीला असलेलं अपरंपार महत्त्व लक्षात घेऊन परिवर्तन ने या वर्षापासून आखाजी पहाट या संगीतमय कार्यक्रमाची सुरुवात करण्याचे ठरवले आहे .
अक्षय तृतीयेचे महत्त्व आता वेगळ्या स्वरूपात असेल पण आजही आखाजी हा मोठा सण आहे यामुळे याचा आनंद पहाटेपासून सुरू करावा म्हणून एका संगीतमय मैफिलीचा आयोजन दिनांक 30 एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम भाऊंचे उद्यान इथे सकाळी सहा वाजता होणार आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना सुनील बारी यांची असून मंजुषा भिडे , नारायण बाविस्कर यांचे दिग्दर्शन आहे.
निर्मिती प्रमुख मोना निंबाळकर व अक्षय नेहे आहेत.
या कार्यक्रमात श्रद्धा पुराणिक कुलकर्णी, विशाल कुलकर्णी , हर्षल पाटील , शरद भालेराव अंजली धुमाळ ,रजनी पवार ,मुकेश खैरे ,रोहित बोरसे ,यश महाजन ,अंजली पाटील, नेहा पवार , तेजस मराठे, हे कलावंत या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला असून रसिकांनी याचा लाभ घ्यावा असा आवाहन परिवर्तन च्या वतीने शंभू पाटील, सुदीप्त सरकार ,नारायण बाविस्कर, अनिल कांकरिया, अमर भाई कुकरेजा, किरण बच्छाव , मंजुषा भिडे डॉ रेखा महाजन ,हर्षल पाटील, मंगेश कुलकर्णी, होरील सिंग राजपूत, वसंत गायकवाड, मानसी गगडाणी यांनी केले आहे .





