जळगावक्रीडाशैक्षणिक

रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम शाळेत फुटबॉल खेळाडू रोनाल्डो यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव ६ फेब्रुवारी २०२५ |
रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम शाळेत जागतिक फुटबॉल सुपरस्टार पोर्तुगीज देशाचे ख्रिस्तियानो रोनाल्डो यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी, फुटबॉलमधील उत्कृष्ट खेळाडूंना प्रेरित करण्याच्या उद्देशाने, रोनाल्डो यांच्या सहीचे टी-शर्ट  संतोष प्रधान (सॅनरोज फाउंडेशन) यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये फुटबॉलबद्दलची आवड अधिक वृद्धिंगत होईल, असे मत संस्थेच्या अध्यक्ष रोजमिन खिमानी/ प्रधान यांनी व्यक्त केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील रोनाल्डो यांच्या खेळातील जिद्द आणि मेहनतीची प्रेरणा घेत, भविष्यात उत्तम खेळाडू बनण्याचा संकल्प व्यक्त केला.

या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, तसेच क्रीडा शिक्षक जितेंद्र सोनवणे उपस्थित होते. रोनाल्डो यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या या उपक्रमाने शाळेत आनंदीआणि उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button