जळगांव जिल्हाशासकीय

मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात १९ व २० तसेच २६ व २७ सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन!

| लोकमाध्यम न्युज | जळगाव, दि.१७ (जिमाका) : भारत निवडणूक आयोग आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात ‘विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६’ अंतर्गत नागरिकांच्या सोयीसाठी १९ व २० तसेच २६ व २७ सप्टेंबर रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ हा कालावधी दावे व हरकती सादर करण्यासाठी निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत नवीन मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती तसेच नाव वगळण्यासाठी अर्ज स्वीकारले जात आहेत. प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या किंवा स्थलांतरित/गैरहजर असल्यामुळे नोंद सुटलेल्या नागरिकांना तसेच १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नवमतदारांना आपले नाव मतदार यादीत नोंदविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.

सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) नेमून दिलेल्या केंद्रांवर वरील दिवशी सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत उपस्थित राहतील.या शिबिरांमध्ये नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नावे व तपशिलांची दुरुस्ती तसेच नाव वगळण्याचे अर्ज भरून घेण्याची कामे केंद्रांवर केली जाणार आहे.नवयुवकांसाठी १ ऑक्टोबर २०२६ रोजी व त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नवमतदारांनी आपली नावे मतदार यादीत नोंदविण्याची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयीन स्तरावरही विशेष प्रयत्न केले जात आहेत. या विशेष शिबिरांमध्ये महिला आणि दिव्यांगांच्या मतदार नोंदणीस विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.

जिल्हयातील सर्व पात्र नागरिक, नवमतदार आणि ज्यांचे नाव प्रारूप मतदार यादीत समाविष्ट नाही अशा सर्व संबंधितांनी नजीकच्या मतदान केंदावर भेट देऊन या विशेष शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपली नावे मतदार यादीत नोंदवावीत किंवा आवश्यक ती दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button