जळगावधार्मिक

भाविकांच्या उत्साहात शिव पार्वती विवाह सोहळा संपन्न

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव २५ मार्च २०२५ |

शिव आणि शक्ती अनादी कालापासून ह्या ब्रम्हांडाच्या उत्पत्ती स्थिती आणि लय या तिघांचे साक्षीदार आहेत. कथेमध्ये शिव पार्वती विवाह समारंभ प्रसंगी *सज रहे भोले बाबा निराले दूल्हे थे* या भजनांवरती सर्वांनी नृत्य करून आनंद घेतला. शिवपार्वती विवाह समारंभात हिमालय पर्वत मेणा राणी, लक्ष्मीनारायण, ब्रह्मदेव, नारद महामुनी, तसेच भूतांची आणि नंदी व शंकर-पार्वती यांची सजीव आरस करण्यात आली. मंत्रघोषात मंगलाष्टका सादर करण्यात आले. दशरथ नगर येथे सुरू असणाऱ्या श्री शिव महापुराण कथेत चौथ्या दिवशी भव्य श्री शिव पार्वती विवाह सोहळा संपन्न झाला.

कथेला उपस्थित भाविकांचा उत्साह लक्षणीय होता. पंचक्रोशीतून भाविक मोठ्या संख्येने कथेसाठी उपस्थित झाले होते. याप्रसंगी आकाशातील फटक्यांची आतिषबाजी करून शिवपार्वती विवाहाची रंगत वाढली होती. सजीव आरस निर्मितीसाठी देवेंद्र बोरसे यांनी जवळपास सर्व चार तासात संपूर्ण सजीव आरस देखाव्यासाठी शृंगार व तयारी केली त्यासाठी परिसरातील भाविकांचे सहकार्य त्यांना लाभले. दशरथ नगर परिसरात चैतन्याचे वातावरण या कथेच्या निमित्ताने झाले आहे. कथेचे निरूपण हरिभक्त परायण देवदत्त महाराज करत असून शिव कथेवरती विशेष अशा रहस्यमय कथांचे विश्लेषण कथेच्या माध्यमातून करत आहे जास्तीत जास्त भाविकांनी या श्री शिव महापुराण कथा श्रवणाचा लाभ घ्यावा असे आयोजक युवा दशरथ नगर मित्र मंडळ व पवन कोळी यांनी केले आहे

आज गणपती बाप्पांच्या जन्माची कथा
श्री शिव महापुराण अंतर्गत आज गणपती बाप्पांच्या जन्माची कथा व अवतारांची कथा सांगण्यात येईल
रुद्र संहिता शत रुद्र संहिता यांचे वर्णन कथेतून आज करण्यात येणार आहे असे हरिभक्त परायण देवदत्त महाराज यांनी सांगितले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button