लोकमाध्यम न्युज | जळगांव १२ डिसेंबर २०२४
मेहरुण परिसरातील गुलाबबाबा कॉलनीतील प्रति पिठापूर श्री अवधूत निराकारी मठात 11 डिसेंबर रोजी श्रीपाद श्रीवल्लभ, दत्तगुरू, नृसिंह सरस्वती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.मंदिरात सकाळी ८ वाजेपासून मुख्य देवताहवन, ब्रमहशिला, कर्मशिला, पिंडिका पूजन करण्यात आली. त्यानंतर १०८ कलश गंगाजलाने मूर्तीला स्नान करून अभिषेक करण्यात आला.यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेहरूण मधील गुलाबबाबा कॉलनीत ३ हजार स्केवयर फूट जागेवर प्रती पिठापूर साकारण्यात आले आहे. स्व.स्मिता लक्ष्मीनारायण लढढा यांनी या मठाची स्थापना केली होती.
श्री अवधूत निराकारी मठात ७ ते ११ डिसेंबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
त्यात कलावंत पवन झवर यांनी सहकारीसह भक्ती गीते सादर केली होती यावेळी भाविकांनी भक्ती गीतांच्या ठेक्यावर नृत्य करून आनंद लुटला.मठा समोर रांगोळी काढण्यात आली तर परिसर फुलांनी सजावट करण्याल आली होती.
बुधवारी सकाळी ८ वाजेला मुख्य देवता हवनाची पूजा करून सुरुवात करण्यात आली.
दुपारी १२ वाजता १० महाराजांच्या उपस्थितीत मंत्रोचाराने श्री अवधूत निराकारी मठात श्रीपाद वल्लभ दत्तगुरू,नृसिह मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
यावेळी ललित लढढा यांनी सपत्नीक विधी केली.
त्यानंतर दुपारी १ वाजता यज्ञाची पूर्णाहुतीने सांगता करण्यात आली. त्यानंतर हजारोच्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा
लाभ घेतला.
यावेळी सचिन लढढा व परिवार तसेच परिसरातील भाविकांच्या उपस्थित पाच दिवसीय मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला.