जळगांव जिल्हामहाराष्ट्र

योजना घेवून केंद्र व राज्य सरकार आलेय तुमच्या दारी; सोमवारपासून जीएस मैदानावर भरणार ५५ कार्यालयांचा कुंभ

८ शाळांसह महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांनाही संधी | खासदार स्मीता वाघ, आमदार सुरेश भोळे यांचा पुढाकार

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. १ नोव्हेंबर २०२५ :राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माहिती घेवून त्याचा लाभ मिळत असतो. परंतु केंद्र शासनाच्या योजनांच्या माहितीसह त्यांचा लाभ घेता यावा यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यत पोहचवण्यासाठी सोमवार ३ नोव्हेंबर पासून जीएस मैदानावर सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ या वेळेत प्रगतीशील महाराष्ट्र २०२५ या तीन दिवशीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात तब्बल ५५ कार्यालये सहभागी होणार असल्याची माहिती खासदार स्मीता वाघ व आमदार सुरेश भोळे यांनी शनिवारी घेतलेल्या सयुक्त पत्रकार परिषदेत दिली. 

एक उन्नत राष्ट्र की ओर हे घोषवाक्य घेवून या प्रदर्शनाची रचना करण्यात आली आहे.जळगावात केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देणारे हे पहिलेच प्रदर्शन आहे. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता उद्घघाटन होईल. हे प्रदर्शन सर्वासाठी खुले आहे. महाविद्यालयीन युवक व नागरिक, शेतकरी हे या प्रदर्शनाचे मुख्य लक्ष्य आहे. ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान या त्रिसुत्रीचा सुरेश संगम करून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

आठ शाळा व कॉलेजच्या विद्या र्थ्यांच्या प्रकल्पाचे सादरीकरण….

या वेळी शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सहभागी होता यावे यासाठी शोध प्रकल्प स्पर्धा घेण्यात आली होती. यातील निवडक प्रकल्पांचे सादरीकरण या प्रदर्शनात करण्यात येणार आहे. विज्ञान तंत्रज्ञानातील कल्पक प्रयोगामधील विजेत्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.

या कार्यालयाचा सहभाग….

कृषी आणि ग्रामीण विकास, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, जैव सुरक्षा, आयुष, होमिओपॅथी अनुसंधान परिषद, केंद्रीय मत्स्य पालन विभाग, महाऊर्जा, भारतीय मानक ब्युरो, आयसीएमआर, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, नॅशनल फर्टीलायझर लिमिटेड, भारतीय लघुउद्योग विकास बँक, इंडियन फार्मस फर्टीलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड, गुजरात इन्फॉर्मेटिक्स लिमिटेड, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, न्यू इंडिया इन्शुरन्स, केंद्रीय गोदाम निगम, भारतीय समुद्री विश्वविद्यालय, केंद्रीय पेट्रोकेमिकल्स, भारतीय चहा बोर्ड, कृषी अधिकार सुरक्षा प्राधिकरण, भारतीय विमान प्राधिकरण, राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास मंडळ, कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट लिमिटेड, महाराष्ट्र बांबू ,ओरिसा बांबू, आधार, जळगाव महापालिका, जळगाव जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ इन क्युबेशन सेंटर.

या प्रदर्शनाचे नियोजन दिल्लीच्या फ्रेडज एक्झीबिशन ॲड प्रमोशन या संस्थेने केले आहे. यावेळी भाजपाचे जळगाव महानगराध्यक्ष दिपक सुर्यवंशी, पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ . राधेशाम चौधरी, मनोज भांडारकर, फ्रेडज एक्झीबिशन ॲड प्रमोशनच्या अखिला श्रीनिवासन , साक्षी सैनी आदी उपस्थित होते.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button