जळगावअपघातमहाराष्ट्र

ब्रेकिंग : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू

| लोकमाध्यम न्युज जळगांव | दि. २८ जानेवारी २०२६ : बारामती (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज बारामती विमानअपघातात मृत्यू झाला आहे, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. या भीषण अपघातात त्यांच्यासह विमानावर असलेले सहकारी व चालक दलाचे सदस्य यांचा देखील मृत्यू झाला, अशी अधिकृत माहिती उपलब्ध झाली आहे. 

मिळालेल्या अहवालानुसार, पवार हे मुंबईहून बारामतीकडे प्रवासा दरम्यान विमानात होते. बारामती विमानतळावर लँडिंग करताना तांत्रिक अडचणींमुळे विमान नियंत्रण हरवून धावपट्टीच्या जवळ एका शेतात कोसळले आणि आग लागली, अशी प्राथमिक माहिती आहे.

घटना घटल्यावर रुग्णवाहिका व बचावपथक घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक अहवालानुसार विमानात एकूण सहा प्रवासी होते, ज्यात उपमुख्यमंत्री पवार, सुरक्षा कर्मचारी तसेच विमानाचे चालक व सहकारी सदस्य होते. सर्वांचा मृत्यू झाला आहे, हे स्थानिक प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अपघाताच्या कारणाची चौकशी सुरू

या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी मंत्री व नागरी विमान चालन महानियंत्रण (DGCA) यांचे तज्ज्ञ आणि स्थानिक अपघात तपास पथक घटनास्थळी पोहोचले आहेत आणि प्राथमिक चौकशी सुरू आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button