लोकमाध्यम न्युज | जळगांव ४ जानेवारी २०२५ |
भारतीय जैन संघटना व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 14, 15, 16 जानेवारी 2025 रोजी शासकीय महाविद्यालय जळगाव (सिव्हिल हॉस्पिटल परिसर) येथे भव्य मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
स्व. उत्तमचंदजी पारख व स्व. जौहरीमलजी श्रीश्रीमाळ यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराला अमेरिकेतील सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर लॅरी वाईन्स्टीन व त्यांची टीम हे दुभंगलेले ओठ, पापण्यांची विकृती, चेहऱ्यावरील वाढ व डाग, नाक व कान यावरील बाह्य विकृतींवर चिकटलेली बोटे, उगलेले गाल आणि प्रकारच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत.
जळालेल्या व भाजलेल्या व पांढरे डाग असलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार नाही.
शिबिरात सहभागी होणाऱ्या सर्व रुग्णांना औषधी सोबत व रुग्णांना चहा व जेवणाची देखील मोफत व्यवस्था केली जाणार आहे रुग्ण नोंदणी व तपासणी शिबिर मंगळवार दिनांक 14/1/2025 रोजी फक्त एक दिवस सकाळी 9 ते 12 पर्यंत असून तपासणीसाठी उपाशीपोटी यावे तसेच या मोफत शस्त्रक्रिया शिबिराला जिल्ह्यातील रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे यासाठी अधिक माहितीसाठी विनयकुमार पारख फोन नंबर 77 82 82 0707, अशोक श्रीश्रीमाल- 98 23019 414 व अजय राखेचा-9403252283 यांचेशी सम्पर्क साधावा.