जळगावसामाजिक

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

सामाजिक कार्यकर्ते रमेशकुमार मुनोत यांचा उपक्रम; जलकुंड, परळ सावलीत ठेवण्याचे आवाहन

| लोकमाध्यम न्युज | : सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढली असून तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. या कडक उन्हामुळे मोकाट जनावरे, पशू आणि पक्ष्यांना पाण्याअभावी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा व्यावसायिक रमेशकुमार मुनोत यांनी भूतदयेच्या भावनेतून जलकुंड आणि परळ मोफत वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे.

या उपक्रमांतर्गत शहरात एकूण १५० जलकुंड आणि ५० परळ वितरित करण्यात येणार आहेत. नागरिकांनी हे जलकुंड सावलीच्या ठिकाणी ठेवून जनावरांना पाण्याची सोय करून द्यावी, असे आवाहन मुनोत यांनी केले आहे. विशेष म्हणजे, ज्यांच्याकडे सावलीची जागा उपलब्ध नाही त्यांच्यासाठी बॅनरची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

समाजसेवेचा हा उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी, इच्छुक नागरिकांनी जलकुंड किंवा परळ मिळवण्यासाठी उद्यापासून 9325922305 या क्रमांकावर संपर्क साधून अगोदर नोंदणी करावी, असे आवाहनही रमेशकुमार मुनोत यांनी केले आहे. जलकुंड आणि परळ वाटप दि.२३ सोमवारपासून ओम् साई रिअल इस्टेट कन्सल्टन्स, शाहू नगर, याठिकाणी वाटप केले जाणार आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button