जळगाव दि .२५ : मन की बात द्वारे सामान्य जनतेत जागृती करणारे समर्पित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या विविध वर्गातील, वयोगटातील घटकांसाठी सुरु केलेल्या ‘मन की बात’ या संवाद उपक्रमास रविवारच्या या टर्म मधील अखेरच्या भागाने स्वल्पविराम दिला आहे.आता लोकसभा निवडणुकीनंतरच ‘मोदी ३: या कार्यक्रमाद्वारे भारतीयांशी संवाद साधतील, असा विश्वास भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ केतकी पाटील यांनी व्यक्त केला.
‘मन की बात’मधून मोदींनी विज्ञान- तंत्रज्ञान, वन्यजीव, पर्यावरण अशा विविध विषयांवर जनतेशी संवाद साधला आणि या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले. प्रधानमंत्री मोदींनी ‘मन की बात’ मधून गेल्या 110 एपिसोड मध्ये देशाच्या उपलब्धतेच्या विषयी,देशाच्या सामुदायिक शक्ती विषयी निरंतर आणि समर्पित भावाने देशाच्या जनतेशी संवाद साधला आहे. या 110 व्या एपिसोड मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील सौ.कल्याणी पाटील यांच्या गांडूळ खत निर्मिती बद्दल चर्चा करून त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहित केले. महिला शक्ती ही काय करू शकते याचे उदाहरण सांगितले, याचबरोबर त्यांनी सेंद्रिय शेतीची आवश्यकता, वन्य जीवन संवर्धन आणि तंत्रज्ञानाची माहिती, रोडगी आयआयटीने तयार केलेला ड्रोन आणि वन्यजीवांचे रक्षण, गरुड ॲप विषयीची माहिती, येणाऱ्या लोकसभेत नव मतदारांना केलेले आवाहन आणि नव भारताच्या निर्मितीसाठी दिलेली साद असे अनेक विषय हाताळले हे देशवासीयांना खूप प्रेरणादायी असल्याचे डॉ केतकी पाटील यांनी सांगितले.
एका दशकात सव्वाशे करोड भारतीयांच्या समस्यांचे संपूर्ण निराकरणासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे एकमेव पंतप्रधान .
गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जगामध्ये अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत. या सगळ्या साध्य केलेल्या बाबी पंतप्रधानांनी त्यांच्या ‘मन की बात’ मध्ये मांडून त्या जनतेपर्यंत पाठवून त्याविषयी जागृती केलेली आहे. मन की बात च्या माध्यमातून पंतप्रधान मोदी हे जगातील पहिले पंतप्रधान ठरलेले आहेत.ज्यांनी सव्वाशे करोड भारतीयांच्या समस्या आणि त्यावर असलेले निराकरण अगदी मेक इन इंडिया पासून म्हणजेच उद्योगापासून तंत्रज्ञानापासून पारंपारिक पद्धती, पाणी समस्या, पाणी प्रदूषण, ते बनारसी साडी, खादी यांची केलेली ब्रॅण्डिंग आणि छोट्या छोट्या गोष्टी हाताळून समाजामध्ये केलेली जागृती ही खूप प्रेरक अशी असल्याचे ही डॉ.केतकी पाटील म्हणाल्या.