जळगांव जिल्हान्यायालयीनमहाराष्ट्र

जळगावातून इतिहास घडविण्याची संधी; ॲड. रेखा घनश्याम कोचुरे बार कौन्सिल निवडणुकीत पहिल्या महिला उमेदवार

| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) – बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा २०२६ ची निवडणूक उद्या (दि. २४ मार्च) पार पडणार असून जळगाव शहरातून यंदा दोन उमेदवार मैदानात उतरले आहेत. ॲड. गुलाबसिंग मानसिंग पाटील आणि ॲड. रेखा घनश्याम कोचुरे हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

यामध्ये विशेष बाब म्हणजे ॲड. रेखा घनश्याम कोचुरे या जळगाव शहरातून बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या निवडणुकीत उतरणाऱ्या पहिल्या महिला उमेदवार ठरल्या आहेत. यापूर्वी ॲड. एल. एल. बेंडाळे, ॲड. भरत देशमुख आदींनी प्रतिनिधित्व केले असले, तरी जळगाव न्यायालयातून महिला उमेदवार कधीच समोर आली नव्हती.

या निवडणुकीत एकूण २३ सदस्यांची निवड होणार असून त्यात ५ महिलांसाठी जागा राखीव आहेत. तसेच २ महिला को-ऑप्ट मेंबर्सची निवड नंतर केली जाणार असून एकूण सदस्यसंख्या २५ असेल.

जर ॲड. रेखा घनश्याम कोचुरे विजयी झाल्या, तर खानदेशातून बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवावर निवडून जाणाऱ्या त्या पहिल्या महिला सदस्य ठरून इतिहास रचतील. त्यामुळे संपूर्ण वकिल समुदायाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button