महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक : 20 रोजी मतदान, 23 रोजी निकाल
आचार संहिता लागु
लोकमाध्यम न्युज | जळगाव १५ ऑक्टोबर २०२४ |
नवी दिल्ली वृत्तसंस्था
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. २० नोव्हेंबर म्हणजे बुधवारी मतदान होणार आहे. राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. दिल्लीमधील केंद्रीय विज्ञान भवन या ठिकाणी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली आणि या तारखा जाहीर केल्या. २६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या सध्याच्या विधानसभेची मुदत संपणार आहे.
महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका होणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद जाहीर केले आहे. 20 नोव्हेंबरला राज्यात निवडणुका तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक तारखांची घोषणा केल्याने आजपासून राज्यात आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे.
29 पर्यंत माघार घेता येणार
राजीव कुमार म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस 29 ऑक्टोबर हा असेल तर 30 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येईल. उमेदवारांना 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे.
महाराष्ट्रात एकूण 9.63 कोटी मतदार असून राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. यामध्ये 234 सर्वसाधारण मतदारसंघ असून 25 मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी तर 29 मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत.
मतदार हेल्प लाईनच्या आधारे मतदार आपल्या मतदान केंद्रासह इतर माहिती मिळवू शकतात.मतदान केंद्रांवर मतदारसंघांसाठी पाण्यासह विविध सुविधा उपलब्ध केल्या जातील. निवडणूक काळात पैशांचा गैरवापर होऊ नये, यासाठी विविध ठिकाणी पथकाद्वारे तपासणी केली जाईल. ज्या उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, त्यांना आपल्याबाबत तीनदा वृत्तपत्रांतून माहिती द्यावी लागेल.
दरम्यान, राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख प्रादेशिक पक्षांमध्ये पडलेल्या फुटीनंतर होत असलेली ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. तसंच महायुती आणि महाविकास आघाडी या नावांनीतयारी झालेल्या नव्या राजकीय समीकरणांचाही या निवडणुकीत कस लागणार आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक चांगलीच रंगतदार ठरणार असून यामध्ये कोण बाजी मारणार, याबाबत देशभरात उत्सुकता आहे.
म्हणून बुधवारी मतदान होणार
राजकीय पक्षांची मागणी निवडणूक आयोगाने मान्य केल्याचे यावरुन दिसून येते. राजकीय पक्षांनी शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी लागून मतदान घेऊ नये, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. सुटी लागून मिळाल्यावर मतदार फिरण्यासाठी किंवा इतर कामांसाठी बाहेर गावी जातात. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारी परिणाम होतो. राजकीय पक्षांची ही मागणी लक्षात घेऊन बुधावारी मतदान निवडणूक आयोगाने ठेवले आहे.
कधी होणार निवडणुक
एकच टप्प्यांत मतदान होणार- २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
२२ ऑक्टोबर रोजी अधिसूचना लागू होईल.
नामांकन दाखल करण्याची मुदत- २९ ऑक्टोबरपर्यंत २०२४ रोजी असेल
दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाची पडताळणी करण्याची तारीख- ३० ऑक्टोबर २०२४
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस- ४ नोव्हेंबर २०२४
मतदान कधी असेल- २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान असेल
मतमोजणी निकाल कधी असेल- २३ नोव्हेंबर नोव्हेंबर