जळगावअध्यात्मिकधार्मिक

अकराशे कि.मी.पायी प्रवास करुन श्रीसंत मुक्ताबाई राम पालखीचे आज जळगांवी आगमन

पंढरीची वारी करून महाराष्ट्रातील सर्वात उशीरा पोहचणारी पालखी

लोकमाध्यम न्युज जळगाव दि. ४ ऑगस्ट २०२५ :जळगांव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान (रामपेठ) संचलित श्री संत मुक्ताबाई राम पालखी आषाढी एकादशी निमित्त श्रीक्षेत्र पंढरपुर येथे आषाढी यात्रेकरीता पायी वारीकरीता ज्येष्ठ वट पौर्णिमेस दि. 10 जुन दिनी प्रस्थान झाली होती. दि.5 जुलै दशमीस पंढरपूर जवळ चिंचोली ग्रामी श्री संत निवृत्तीनाथ व श्री संत मुक्ताई यांचा भाऊ बहीण तसेच गुरुशिष्य भेट दर्शन सोहळा होऊन पालखी पंढरीत दाखल होते. या पालखी मागे भक्त शिरोमणी श्री संत नामदेव महाराज व इतर मान्यवर ज्ञानोबादी संत मंडळींच्या पालख्यांचे पंढरीत शुभागमन होते. श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पाच दिवसात श्री संत मुक्ताई व प्रभू रामरायाचे पंचायतन मुर्तीस चंद्रभागेचे अवभुत स्नान पुजाभिषेक होऊन नगरप्रदक्षिणा, भगवान श्री पांडुरंगाचे व विविध संतांचे दर्शन होऊन पुढील संतांच्या मानाच्या पालख्या श्रीसंत मुक्ताबाई राम पालखी यांचेशी भेट होतात श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्री विठू माऊलीचे दर्शन घेऊन पालखी पुन्हा परतीला निघाली. जाऊन येऊन असुन 1100 कि. मी. पायी प्रवास करीत पालखी श्रीसंत अप्पा महाराज समाधी मंदिर, (जळगांव ) येथे दि. 4 ऑगस्ट 2025, सोमवार दिनी संध्याकाळी 5 वाजता आगमन होत आहे.श्री आप्पा महाराज समाधी येथे दुपारी 4 वाजता श्री मकरंद देशमुख (जळगाव) यांचे अभंगवाणी कार्यक्रम होईल. त्यानंतर 5 वाजता पालखीचे आगमन होईल.

श्री हरिपाठ भजन श्री आप्पा महाराजांची आरती व दर्शन होऊन. तसेच यावेळी जळगांव नगरीतील असंख्य भाविक भक्त पालखीच्या स्वागताला उपस्थित असतील. पालखी व वारकरी मंडळी श्रीसंत अप्पा महाराज समाधीचे दर्शन घेवुन मिरवणुकीने राजकमल चौक, सुभाष चौक, सराफ बाजार, रथ चौक, श्रीराम मंदिर, कोल्हेवाडा, श्रीसंत बाबजी महाराज मंदिर गोपाळपुरा, विठ्ठलपेठ, तेली चौक, राम मारोतीपेठ मार्गे श्रीराम मंदिरात रात्री 7 वाजता येईल. भजनाने पालखीच्या पायी वारीची सांगता होईल. समस्त भाविकांनी पालखीचे आपल्या परिसरात सडा संमार्जन रांगोळ्या काढून श्रीसंत मुक्ताबाईचे आरती करुन स्वागत करावे, सहभागी होवून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम मंदिर संस्थान ने केले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button