जळगांव जिल्हाकृषी

अभियांत्रिकी पद्धतीने शेती करा – डॉ. इंद्रमणी मिश्रा

जैन हिल्सला राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा; बळीराजाचे पूजन

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. २३ डिसेंबर : ज्याप्रमाणे तंत्रज्ञान प्रगत होत आहे त्याप्रमाणेच मनुष्यालासुद्धा तंत्रज्ञानासोबत चालले पाहिजे. ड्रोन, एआयसह आधुनिक तंत्रज्ञान हे शेतीत येत आहे त्याचा चपलख वापर केला पाहिजे. आर्थिक दृष्ट्या परवडेल अशी अभियांत्रिकी शेती केली पाहिजे. त्यासाठी ड्रोन पायलट प्रशिक्षण वर्गावर भर दिला जात आहे, यातून ड्रोन फवारणीसह अन्य सेवांमध्ये रोजगार वाढेल. त्यासाठी विविध संस्था, औद्योगक क्षेत्र, शिक्षण क्षेत्र आणि सरकार यांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. कृत्रीम बुद्धीमत्तेचा वापर करुन निविष्ठामधील खर्च कसा कमी करता येईल, उत्कृष्ट रोपांची निर्मिती, यासाठी शेतीमधील आयटी तज्ज्ञ गावोगावी घडले पाहिजे यातून विकसीत भारत घडू शकतो असे मत डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा यांनी व्यक्त केले.

– ‘सायन्स टेक@वर्क’ या कृषीमहोत्सवात राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करताना शास्त्रज्ञ, शेतकरी व अभ्यासक

जैन हिल्स येथे सुरू असलेल्या ‘सायन्स टेकॅ@वर्क’ या हायटेक शेतीचा नवा हुंकार कृषीमहोत्सवात राष्ट्रीय कृषी दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी डॉ. इंद्रमणी मिश्रा यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांच्यासमवेत माजी डीडीजी हॉर्टिकल्चर डॉ. एन. के. कृष्णकुमार, नागपूरचे इंडियन सोसायटी ऑफ सिट्रसचे अध्यक्ष डॉ. दिलीप घोष, पंजाब अॅग्रीकल्चर युनिव्हसिर्टी लुधियानाचे शास्त्रज्ञ डॉ. संदीप सिंग, डॉ. एम. कृष्ण रेड्डी, इस्त्राईलचे शास्त्रज्ञ डॉ. अवी सडका, डॉ. आशिष वरघणे, अमेरिकेचे शास्त्रज्ञ डॉ. मंजूनाथन, जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, डॉ. के. बी. पाटील, डॉ. बि. के. यादव, जलतज्ज्ञ डॉ. सुधीर भोंगळे, बी. डी. जडे, डॉ. डी. जी. पाटील, डॉ. विकास बोरोले, संजय सोन्नजे, तमस पटेल, गिरीष कुलकर्णी, अविनाश इंगळे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते बळीराम पूजन करण्यात आले. त्यानंतर कृषी महोत्सव पाहण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना गांधी टोपी, बागदार रूमाल तर महिला शेतकऱ्यांना दुप्पटा वाटप करण्यात आले.

 

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button