NEET पेपरफुटी प्रकरणी महाविकास आघाडीच्या युवक संघटनांतर्फे तीव्र आंदोलन
युवासेना, युवक काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या वतीने आयोजन

| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) दि. २० – देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या NEET परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व असंतोष निर्माण झाला आहे. या प्रकरणात मॉडर्न कॉलेज, पुणे येथील एका महिला प्राध्यापिकेला अटक करण्यात आली असून, यामध्ये इतर व्यक्ती किंवा संघटित रॅकेटचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही.सदर प्राध्यापिकेच्या निषेधार्थ व सर्व दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी महाविकास आघाडीतील युवासेना, युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या वतीने आज येथील एम. जे. कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.
सदर आंदोलनात मविआच्या युवक संघटनांतर्फे प्रश्नपत्रिकेची बोली लावण्यात आली. १६ लाख, २० लाख, २२ लाख अशा किंमतीत उपस्थितांनी मोदी सरकारच्या फुटलेल्या NEET प्रश्नपत्रिकेला घेण्याची प्रतिकृती दाखवली. लहान मुलांकरिता वापरत असलेले १० रू. किंमतीचे डायपर देखील गळत नाही, परंतू राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) विद्यार्थ्यांकडून प्रवेश परीक्षेच्या नावावर अवाढव्य परीक्षा शुल्क आकारण्यात येते तरीही पेपरफुटी कशी होते यावर व्यंगात्मक आंदोलन करण्यात आले.
याठिकाणी “शिक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे”, “शिक्षण मंत्र्यांनी राजिनामा द्यावा”, “केंद्र शासनाचे करायचे काय? खाली डोकं वर पाय”, अशा विविध प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. वाहतुक ठप्प झाल्याने पोलीसांनी मविआच्या आंदोलनकर्त्यांना टांगाटोळी करून पोलीस गाड्यांमध्ये रामानंदनगर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले.
अशा प्रकारांमुळे शिक्षणव्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यात येत असून प्रामाणिक विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होत आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य भावना शासन-प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच या प्रकरणातील सर्व संबंधित आरोपींवर कठोर व निष्पक्ष कारवाई व्हावी, या मागणीसाठी युवासेना, युवक काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्यावतीने एम. जे. कॉलेजसमोर मविआच्या युवक संघटनेचे विराज कावडीया, रिकु चौधरी, मुजीब पटेल, विनायक पाटील, प्रितम शिंदे, गौरव वाणी यांच्या नेतृत्वात लोकशाही मार्गाने निषेध आंदोलन करण्यात आले.
सदर आंदोलनात गुलाबराव वाघ, शरद तायडे, अशोक लाडवंजारी, शाम तायडे, निलेश चौधरी, सुनिल माळी, भाऊसाहेब सोनवणे, संग्राम सुर्यवंशी, शोएब खाटीक, जाकिर बागवान, आकिब शेख, बाबा देशमुख, आकाश हिवाळे, ॲङ अविनाश महिरे, चेतन पवार, पारस तायडे, रोहीत जंगले, अजय खैरनार, मुजक्कीर शेख, अजय वंजारी, विशाल पवार, गौरव डांगे, कुणाल हटकर, घनशाम लोहार, मच्छिंद्र निकम आदि उपस्थित होते.






