जळगावअध्यात्मिकधार्मिक

गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त कांचन नगर परिसरात भव्य पालखी सोहळा उत्साहात

''गण गण गणात बोते' चा जयघोष, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

| लोकमाध्यम न्युज जळगांव | दि. ९ फेब्रुवारी २०२६ : संत श्री गजानन महाराज यांचा १४८ वा प्रकटदिन सोहळ्यानिमित्त आज रविवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी महाजन परिवारातर्फे कांचन नगर परिसरात भक्तिमय वातावरणात भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने पालखीत सहभागी झाले होते. 

दरवर्षीप्रमाणे महाजन परिवारातर्फे श्री गजानन महाराज प्रकटदिन सोहळ्यानिमित्त महाजन आर्ट, कांचन नगर, कालिंका माता मंदिराजवळ विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी ही परंपरा कायम ठेवली जात असून यंदाचे हे २५ वे वर्ष आहे. या ठिकाणी दि. ४ ते ८ फेब्रुवारीपर्यंत आयोजित ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण सोहळ्यात शेकडो भाविकांनी एकाग्रतेने ग्रंथाचे वाचन केले. पहाटे काकड आरतीपासून सुरू होणारा हा सोहळा रात्री शेजआरतीपर्यंत भक्तीमय वातावरणात पार पडत होता. विशेषत म्हणजे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग लक्षणीय होता.भव्य पालखी सोहळा

रविवारी सकाळी १०.३० वाजता महाजन आर्ट परिसरातून श्रींची भव्य पालखी काढण्यात आली. पालखीत पारंपारिक वेशभूषेतील वारकरी, टाळ-मृदंगाचा गजर आणि महिला भजनी मंडळांचा सहभाग होता. तसेच ठिकठिकाणी परिसरातील नागरिकांनी रांगोळ्या काढून आणि पुष्पवृष्टी करून पालखीचे स्वागत केले. यावेळी तरुणी – महिलांनी डोक्यावर कळस, तुलसी, ग्रंथ घेऊन पालखीत सहभाग नोंदविला. तसेच पालखीचे जागोजागी गृहिणी पूजा-अर्चा करीत होते. पालखीत असलेली गजानन महाराजांची प्रतिमा, ‘विजय ग्रंथ’ आणि पादुका आकर्षणाचे केंद्र ठरले होते. पारायणाच्या सांगता दिनी श्रींची पालखी काढण्यात आली.  उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री ची महाआरती करण्यात आली. यावेळी नगरसेविका सिंधुताई कोल्हे, शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष सरिता कोल्हे-माळी, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, किशोर बाविस्कर, उज्वला बाविस्कर, नगरसेवक निलेश तायडे, नगरसेवक प्रवीण कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते मोहन तिवारी, शिवसेनेच्या शोभा चौधरी, ज्योती शिवदे आदी उपस्थित होते.

भजन आणि सत्संग कार्यक्रम

पालखी सोहळ्यानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. “झुणका-भाकरी” आणि “पिठलं-भात” या महाराजांच्या आवडीच्या प्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. तसेच संध्याकाळी येथे भजन आणि सत्संग कार्यक्रम झाला. या संपूर्ण सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी वसंत पाटील, यमुना पाटील, नंदू पाटील, हिरकणी पाटील, रवींद्र पाटील, संगीता पाटील, अनिल पाटील, प्रतिभा पाटील (महाजन परिवार) आदींनी सहकार्य केले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button