जळगावकृषीमहाराष्ट्र

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी; जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

| लोकमाध्यम न्युज जळगांव | दि. १० फेब्रुवारी २०२६ : जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या ६३ व्या जन्मदिनाच्या औचित्याने, जैन इरिगेशनने संशोधित व विकसित केलेल्या ‘जैन मॅडरिन-१’ या नवीन संत्रा वाणाचे लोकार्पण अशोक जैन व सौ. ज्योती जैन यांच्या हस्ते जैन हिल्स येथील केळीच्या बनात करण्यात आले. या सोहळ्याला जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांचा वारसा भक्कमपणे पुढे नेणाऱ्या जैन परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती. तसेच जैन इरिगेशनचे कृषितज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि सहकारी यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

नव्याने विकसीत केलेल्या जाती ‘जैन मॅडरिन-१’ ही जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड (JISL) यांनी शेतकऱ्यांसाठी विकसित केलेले एक आधुनिक आणि उत्पन्नक्षम संत्र्याचे नवीन वाण आहे. पारंपरिक संत्र्याच्या तुलनेत ही जात लवकर फळधारणा होत असलेली आहे. या वाणामुळे कमी कालावधीत बाजारात येणारा दर्जेदार माल मिळत असल्याने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याची संधी वाढते. विशेष म्हणजे दुसऱ्याच वर्षापासून झाडांना फळधारणा सुरू होते, त्यामुळे संत्रा बाग गुंतवणुकीवर लवकर परतावा मिळतो.

या संत्र्याची चव ही नागपूर संत्र्यापेक्षा अधिक गोड असून फळांचा रंग आकर्षक, गडद आणि लालसर केशरी (reddish orange) असतो. फळांचा आकार, सोलण्याची सुलभता आणि रसाळपणा यामुळे ‘जैन मॅडरिन-१’ हा टेबल पर्पज म्हणजेच थेट खाण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ग्राहकांच्या पसंतीस उतरतील असे दर्जेदार फळ मिळत असल्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेसोबतच निर्यातीसाठीही ही जात आशादायक ठरू शकते असा विश्वास कंपनीचे लिंबू वर्गिय फळांचे संशोधक डॉ. मिलींद लदानिया यांनी सांगितले.

उत्पादनाच्या दृष्टीने ही जात भरघोस उत्पादन देणारी आहे. या जातीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे फुलधारणा करण्यासाठी पाण्याचा ताण (water stress) देण्याची आवश्यकता नसते, त्यामुळे पाणी व्यवस्थापन अत्यंत सुलभ होते. कमी पाण्यातही स्थिर उत्पादन देणारी ‘जैन मॅडरिन-१’ ही जात बदलत्या हवामानात आणि मर्यादित संसाधनांमध्ये शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक विश्वासार्ह आणि फायदेशीर पर्याय ठरू शकतो.नव्याने विकसीत केलेल्या ‘जैन मॅडरिन-१’ या वाणाचे लोकार्पण करताना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन आणि सौ. ज्योती जैन, शेजारी कल्याणी नागुलकर, सौ. शोभना जैन, अजित जैन, डॉ. भावना जैन, सौ निशा व अनिल जैन डॉ. बी.के. यादव..

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button