जळगांव जिल्हाताज्या बातम्या

आ. एकनाथराव खडसेंचा 30 रोजी अमृतमहोत्सव सोहळा ! मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवारांची विशेष उपस्थिती; माजी सभापती अरूणभाई गुजराथी यांची माहिती

| लोकमाध्यम न्युज | जळगाव दि. २० : माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांचा अमृत महोत्सव सोहळ्यासाठी राज्यातील तसेच केंद्र शासनातील सर्व राजकिय नेत्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे हा सोहळा केवळ अमृत महोत्सव नव्हे तर सर्वपक्षीय कृतज्ञता सोहळा ठरणार असल्याची माहिती अमृत महोत्सवी समितीचे स्वागताध्यक्ष तथा विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आमदार खडसे यांच्या जळगावातील निवासस्थानी झालेल्या या पत्रकार परिषदेत माजी आमदार डॉ.गुरुमुख जगवाणी, अमृत महोत्सवी समितीचे सचिव प्रा. सुनिल वाणी अशोक लाडवंजारी,सुनील भैय्या माळी, संग्रामसिंह सुर्यवंशी, दिपक फलक,किरण राजपूत आदी उपस्थित होते.अरुणभाई गुजराथी यांनी सांगितले की, आमदार खडसे सहा वेळा विधानसभेत तसेच एक वेळा विधान परिषदेला निवडून आले आहेत.त्यांच्या चाळीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी सेवा आणि विकासाच्या माध्यमातून मोठी कामे केली आहेत. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सोहळा आयोजित केला आहे. दि.26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान सोहळ्यानिमित्त मुक्ताईनगरातील खडसे यांच्या मूळ गावी कोथळी येथे भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी राज्यभरातून साधू व संत येणार आहेत. आमदार खडसे यांचा 75 वा वाढदिवस 2 सप्टेंबर रोजी आहे. त्यानिमित्त 30 ऑगस्ट रोजी कोथळी येथील संत मुक्ताबाई मंदिरात अमृत महोत्सव सोहळा साजरा होणार आहेे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची विशेष उपस्थिती

कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, भाजपाचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व पक्षाचे प्रमुख, आमदार व खासदार यांना निमंत्रण देण्यात आले आहे. सर्वांनी येण्याचे मान्य केले असल्याचेही अरुणभाई गुजराथी यांनी सांगितले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button