जळगावमहाराष्ट्र

एक संवेदनशील कलाकारच नव्हे, तर शेतकऱ्यांशी मनापासून नाते जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस काळाच्या पडद्याआड : अशोक जैन

| लोकमाध्यम न्युज | जळगाव : “नाना पाटेकर यांच्या दुःखद निधनाची वार्ता समजली अतिव दुःख झाले. नानांच्या निधनाने एक संवेदनशील कलाकारच नव्हे, तर माती, शेती आणि शेतकऱ्यांशी मनापासून नाते जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे,” अशा शब्दांत जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल शोकभावना व्यक्त केल्या. 

जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड (जैन हिल्स) आणि नाना पाटेकर यांच्यातील स्नेहाच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी सांगितले की, नानांनी २००५ आणि २०१५ मध्ये जैन हिल्सला सदिच्छा भेट दिली होती. विशेषतः १६ ऑक्टोबर २०१५ रोजी मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांच्या ‘नाम’ संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी जैन हिल्सला आयोजित कार्यक्रमात नाना आणि श्रद्धेय मोठ्याभाऊंची (भवरलालजी जैन) भेट झाली होती. शेती, माती आणि पाणी या विषयांवर दोघांमध्ये अत्यंत जिव्हाळ्याने सविस्तर संवाद झाला. तो केवळ औपचारिक संवाद नव्हता, तर मातीवर प्रेम करणाऱ्या दोन संवेदनशील व्यक्तींचा तो संवाद होता.या भेटीत नानांनी जैन हिल्स येथील शेती संशोधन केंद्राला उत्सुकतेने भेट देऊन विविध शेती प्रयोगांची आस्थेने माहिती घेतली. जैन इरिगेशनने विकसित केलेल्या आंब्याच्या रोपांची त्यांनी आपल्या फार्म हाऊससाठी श्रद्धेय मोठेभाऊंकडे मागणी केली होती. त्यानंतर आंबा, पेरू, सीताफळ आणि नारळाची रोपे त्यांच्या फार्म हाऊसवर पाठविण्यात आली. नानांनी ही रोपे केवळ लावली नाहीत, तर मोठ्या प्रेमाने जोपासली. श्रद्धेय मोठेभाऊ, जैन परिवार आणि नाना पाटेकर यांच्यातील हा स्नेहाचा धागा शेती, माती, पाणी आणि माणुसकीने जोडलेला होता. नाना गेले, पण त्यांनी जपलेली ही नाळ आणि त्यांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत असतील हे तितकेच खरे. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

अशोक जैन अध्यक्ष, जैन इरिगेशन  जळगांव

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button