जळगाववैद्यकियसामाजिक

चिमुकल्या जीवासाठी जळगावचा रस्ता मोकळा! ‘ग्रीन कॉरिडॉर’मुळे नवजात बाळ सुरक्षितपणे पोहचले हैदराबादला

| लोकमाध्यम NEWS | जळगाव दि 24 (प्रतिनिधी)   मुदतीपूर्वी जन्मलेल्या नवजात बाळाला तातडीने उच्चस्तरीय उपचार मिळावेत, यासाठी जळगाव पोलिसांनी रुग्णालयापासून विमानतळापर्यंत ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार केला. पोलिसांनी रुग्णवाहिकेसाठी मार्ग मोकळा ठेवला, तर विमानतळ पथकाने एअर ॲम्ब्युलन्सच्या उड्डाणासाठी आवश्यक समन्वय साधला. या संयुक्त प्रयत्नांतून बाळाला पुढील उपचारांसाठी सुरक्षितपणे हैदराबादला पोहोचवण्यात आले.

जळगावचे व्यावसायिक रवी लड्डा यांच्या नात श्रद्धा रुपम लड्डा यांची मुदतीपूर्वी प्रसूती झाली. नवजात बाळावर डॉ. खडके यांच्या विश्वेश बाल रुग्णालयात उपचार सुरू होते. बाळाला उच्चस्तरीय नवजात अतिदक्षता उपचारांची गरज असल्याने हैदराबाद येथील किंग्स रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली.

प्रत्येक मिनिट महत्त्वाचे, पोलिसांचा चोख बंदोबस्त

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव पोलीस आणि वाहतूक शाखेने रुग्णवाहिकेच्या मार्गावर चोख बंदोबस्त ठेवला. अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित, पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, वाहतूक शाखेचे गांगुर्डे आणि पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांनी वाहतूक नियोजन आणि बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळली. मार्गावरील वाहतूक नियंत्रित केल्याने बाळाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका विनाअडथळा विमानतळावर पोहोचली.

विमानतळ पथक आणि ‘एमएसएफ’चे मोलाचे सहकार्य

जळगाव विमानतळाचे हर्षजी त्रिपाठी, ऑपरेशन इन्चार्ज कमलेश बचाव, हवाई वाहतूक नियंत्रण विभागाचे (एटीसी) नवीन आर्या अलायन्स सिक्युरिटीच्या कर्मचारी कु. अंकिता खीची आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे (एमएसएफ) अधिकारी व कर्मचारी यांनी विमानतळावरील व्यवस्थेत मोलाचे सहकार्य केले. डॉक्टर, रुग्णवाहिका पथक, पोलीस, वाहतूक शाखा आणि विमानतळ कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे रुग्णालयातून सुरू झालेला चिमुकल्याचा प्रवास हैदराबादपर्यंत सुरक्षितपणे पूर्ण झाला.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button