महाशिवरात्री निमित्ताने ओंकारेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी….
आ.राजु मामा भोळे यांच्या हस्ते झाली महाआरती
जळगांव दि.८ : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्याओंकारेश्वर मंदिरात आज महाशिवरात्री निमित्त पहाटे चार वाजेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.परिसरात यात्रेचे स्वरूप आले होते.पहाटे पासूनच वेगवेगळ्या पूजा अभिषेक विधींना सुरुवात झाली तर दुपारी बारा वाजेच्या सुमारास जळगाव शहराचे भाजपचे आमदार राजु मामा भोळे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
शहरातील ओंकारेश्वर मंदिर जागृत देवस्थान असल्यामुळे आज महाशिवरात्री निमित्त सकाळपासूनच महिला पुरुष,भाविकांची मोठी गर्दी झाली होती.संपूर्ण मंदिरावर व परीसरात नयनरम्य, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सकाळ प्रहर मध्ये जितेंद्र जोशी व शरद जोशी यांच्या हस्ते तर दहा ते बारा मध्ये उपाध्याय यांच्या हस्ते पूजा मंदिरातर्फे विधिवत पुजा अभिषेक करण्यात आला.संजय जोशी राहुल जोशी विष्णू जोशी आशिष जोशी व समस्त सेवेकरी यांनी सेवा दिली.
दुपारी बारा वाजता जळगांव शहराचे भाजपाचे आमदार राजु मामा भोळे, ईश्वर सोनी व जुगल किशोर जोशी ,हेमंत उपाध्याय ,पंडित त्रिपाठी ,पांडेजी व दीपक जोशी यांच्या हस्ते शंखध्वनि नगारा वाद्याच्या गजरात १०८ निरंजण्यांद्वारे महाआरती करण्यात आली.भाविकांनी श्री शिवाय नमस्तुभ्यं ,ओम् नमः शिवाय, नमः पार्वती पते हर हर महादेव, चा जयघोष केला.