जळगांव जिल्हाराजकिय

मलकापूर-नांदुरा भागात उद्योगांना चालना मिळेल : आमदार राजेश एकडे

निमगाव येथील कॉर्नर सभेत व्यक्त केला विश्वास

नांदुरा दि.५ मे २०२४ : महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी शून्यातून विश्व निर्माण करत हजारो कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या भागाचे ते खासदार झाल्यास उद्योगांना चालना मिळून बेरोजगारीचा प्रश्न सुटेल असा आशावाद मलकापूरचे आमदार राजेश एकडे यांनी व्यक्त केला.

निमगाव ता. नांदुरा येथे महाविकास आघाडीच्या आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते
ते पुढे म्हणाले की, देशात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. देशभरात मोदी विरुद्ध लाट निर्माण झाली आहे. गेल्या दहा वर्षात जनतेला भूलथापेशिवाय दुसरे काही मिळाले नाही. श्रीराम पाटील भाग्यवान आहेत की, त्यांनी या वेळेला उमेदवारी घेतली आहे. त्यांचा विजय हा नक्की आहे. निमगाव परिसर नेहमीच माझ्या पाठीशी उभा राहिला आहे, आता श्रीराम दादा पाटील यांच्याही पाठीशी मी उभा राहील यात शंका नाही. यावेळी प्रसन्नजीत पाटील, अरविंद कोलते, संतोष रायपुरे, वनिता गायकवाड यांचीही भाषणे झाली. या सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर मत देऊन श्रीराम पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.

विकास कामाचा अनुशेष भरून काढू : श्रीराम पाटील

जनतेचा विश्वास हीच माझी प्रॉपर्टी, मी सदैव जनतेच्या सेवेत आहे. राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्याला मी तडा जाऊ देणार नाही. जनतेची प्रामाणिकपणे सेवा करीन.गेल्या दहा वर्षाचा विकास कामाचा अनुशेष आपल्याला भरून काढायचा आहे. नांदुरा ते जळगाव जामोद रस्त्यावर असलेल्या रेल्वे गेटचा प्रश्न आमदार राजेश एकडे यांच्या सहकार्याने सोडवला जाईल असे आश्वासन उमेदवार श्रीराम पाटील यांनी दिले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button